Home Blog नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे ईद ए मिलाद मिरवणुकीतील मंडळाचा गौरव ;...

नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे ईद ए मिलाद मिरवणुकीतील मंडळाचा गौरव ; अध्यक्ष दिनेश निकाळे यांच्या हस्ते सन्मान

0
186 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

जश्‍ने ईद मिलादुन्नबी हजरत पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त आयोजित जुलूस म्हणजेच मिरवणुकीत सहभागी मंडळाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.मौलानांना धार्मिक रुमाल देण्यात आला. उत्सव समिती अध्यक्ष कामिल इनामदार,ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे यांच्या हस्ते सन्मान झाला.

सकाळी जेलरोड, नाशिकरोड, सिन्नरफाटा, सुभाष रोड आदी विविध भागातून मिरवणुक काढण्यात आली.यावेळी मिरवणुकीत आकर्षक देखाव्यासह चित्ररथ होते. मोहम्मद पैंगंबर यांच्या जयघोषात मिरवणूक निघाली होती. मुस्लिम बांधाव डी.जे. साऊंड सिस्टीम च्या तालावर उत्साहात सहभागी झाले. मंडळांच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या सन्मानप्रसंगी समिती सदस्य – अल्ताफ सैय्यद,नितीन गुणवंत,शाहिद शेख, ॲड.एन.बी.सुर्यवंशी,किरण लोखंडे,उमेश दासवानी,दशरथ साळवे,मुन्ना सैय्यद,तोफिक शेख,अरुणा आहेर,सिद्धार्थ गांगुर्डे,ॲड.जितेंद्र निकाळे,उमेश चव्हाण,जाकीर सैय्यद,युसुफ पठाण,सुनिल निरभवने,राहुल बागुल,अजिज खान,एजाज सैय्यद,मंगेश बनसोडे सुहास गांगुर्डे,योगेश आव्हाड,विद्युत नगरकर आदीसह नागरिक उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version