512 Post Views
नाशिकरोड : प्रतिनिधी
महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दि. ९ व १० सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे.
