Home Blog नाशिक रोडला १३० सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग ; ईगल स्पोर्ट्स अँड सोशल...

नाशिक रोडला १३० सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग ; ईगल स्पोर्ट्स अँड सोशल क्लब साकारतेय संत मीराबाई यांचा चलत देखावा

0
287 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिक रोड परिसरात गणेशोत्सवाला उत्साहात सुरूवात होत आहे.यावर्षी १३०  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांची परवानगी घेतली आहे. ईगल स्पोर्ट्स अँड सोशल क्लब यांचा आर्टिलरी सेंटर रोड वरील भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या संत मीराबाई यांचा चलत देखावा यंदा लक्षवेधक असणार आहे. त्याचप्रमाणे गणेश भक्तांना प्रेस कामगार आणि बालाजी मित्र मंडळाच्या देखाव्याचे आकर्षण असणार आहे.

यावर्षी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७० व नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६० अशा एकूण १३० सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी घेतली आहे. नाशिक रोड व उपनगर पोलिस ठाण्याकडून उत्सवानिमित्त ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी ( दि. २६ ) पावसाच्या सरी कोसळत असल्याने देखावा उभारणी, विद्युत रोषणाईच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता. सोसायटी, नागरी वसाहतीदेखील गणेशोत्सवाची तयार सुरू होती. घरोघरी गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू होती.शिवाजी पुतळा, देवी चौक, देवळाली गाव, यशवंत मंडई, जेल रोड इंगळेनगर, शिवाजी पुतळा चौक या ठिकाणी पूजेचे साहित्य, हार फूल, फळे आदी खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाच्या सरी कोसळू लागल्याने बाजारापेठातील गर्दी कमी झाली होती. बिटको चौकाजवळील कोठारी यांच्या जागेत गणेशमूर्ती विक्रीच्या गाळ्यांच्या ठिकाणी दुपारनंतर सायंकाळी उशिरापर्यंत मूर्ती खरेदी करण्यासाठी व आजूबाजूला असलेले सजावटीचे साहित्य, पाट, चौरंग खरेदीसाठी गर्दी झाल्याने वाहतूकीचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसून येत होते.

२१ किलो चांदीच्या गणेश मूर्तीचे आकर्षण

देवळाली गावातील गणेश मित्र मंडळ सार्वजनिक पार या मंडळाची २१ किलो चांदीची गणेश मूर्ती आहे. गांधीनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंडळाची दोन किलो चांदीची गणेश मूर्ती व दोनशे ग्रॅम चांदीचा मुकुट, चांदीचे कान, हात, हार, व इतर वस्तू आहेत. बालाजी फाऊंशन मंडळाकडेही चांदीचे हात, कान आदी साहित्य आहे. मंडळांचे देखावा व आरस उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version