Home Blog परप्रांतीयास मारहाण प्रकरणी मनसे पदाधिका-यांना जामीन

परप्रांतीयास मारहाण प्रकरणी मनसे पदाधिका-यांना जामीन

0
128 Post Views

नाशिक रोड : प्रतिनिधी

नाशिक रोडच्या जय भवानी रोड येथे परप्रांतियाला मारहाण केल्या प्रकरणी मनसेच्या पदाधिका-यांना जामीन मंजूर झाला आहे.जयभवानी रोड परिसरात लासुरे या मराठी कुटुंबाला परप्रांतीय व्यक्तीने दादागिरी केल्याची घटना काल घडली होती. मनसे पदाधिकाऱ्यांनी पारपत्रतीयाला जाब विचारत चोप दिल्याची घटना घडली होती.

लासुरेंच्या दुचाकीला परप्रांतियाच्या गाडीचा धक्का लागला. त्यातून त्याने वाद घातला. यामध्ये मनसे पदाधिका-यांनी तत्काळ हस्तक्षेप करून परप्रांतियाला चोप दिला आणि मराठी कुटुंबाची माफी मागण्यास भाग पाडले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित व आदित्य कुलकर्णी यांच्यासह लासुरे कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना काल रात्री अटक झाली होती. रविवारी नाशिक रोड कोर्टात त्यांना हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. नितीन पंडित, आदित्य कुलकर्णी, शुभम लासुरे यांच्यातर्फे ॲड. राहुल तिडके, ॲड. महेंद्र डहाळे, ॲड. कैलास गुजराथी, अॅड. अशोक कटारे, ॲड. योगेश शिरसाठ यांनी बाजू मांडली. मनसचे विभाग अध्यक्ष बंटी कोरडे, संतोष सहाणे, शशी चौधरी, बाजीराव मते, संतोष पगारे, रोहित शिंदे, मयूर रत्नपारखी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version