184 Post Views
नाशिकरोड : प्रतिनिधी
शून्य विद्युत अपघातासाठी जनजागृती अभियानातील विविध उपक्रमांत लोकसहभागाचे महावितरणने नवीन पाच विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या दोन्ही संस्थांच्या वतीने सोमवारी (दि. ११) पाचही विक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करून महावितरणचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून विद्युत सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानातील लोकसहभागाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतल्याबद्दल त्यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
