Home Blog नाशिकरोडला भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा

नाशिकरोडला भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा

0
255 Post Views

 

नाशिकरोड : प्रतिनिधी

स्वकुळ साळी सेवा समाज नाशिक रोड यांच्यावतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा येथील राजलक्ष्मी हॉल मध्ये नुकतीच पार पडली.जिव्हेश्वर जन्मोध्याय वाचन रवींद्र गायकवाड यांनी केले. भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त पालखी मिरवणूक,सत्यनारायण पूजा, वार्षिक सर्वसाधारण सभा व महिलांचे हळदीकुंकू व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलेश दत्तात्रय साळी उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक महापालिका नाशिक त्याचबरोबर सौ संगीता किशोर साळी,सहाय्यक राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य व सी.पी.साळी संस्थापक अध्यक्ष कुशाग्र फाउंडेशन नाशिक स्वकुळ साळी सेवा समाज नाशिक रोडचे अध्यक्ष श्री सुनील तुकाराम ढगे, उपाध्यक्ष रामदास धोंडीराम पिंगटे, सचिव सचिन चांगटे, खजिनदार चंद्रशेखर सरोदे, सल्लागार बीबी बावधनकर आदी उपस्थित होते.

साळी समाजातील C.A.आदित्य सरोदे,MBBS नक्षत्रा साळी M.S.श्वेता साळी,समृद्धी साळी BE सिध्देश चांगटे ,अंश दिंडे या उच्चशिक्षित गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. इयत्ता १० वी प्रथम सायली गवते व इयत्ता १२ वी प्रथम अनुश्री बर्वे यांना समाजबांधव सुनील धारणकर व रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथम क्रमांकाचे विशेष बक्षीस दिले. हाऊस दिंडे यांना रवींद्र जांभळे यांनी आई-वडिलांच्या स्मृती विशेष पारितोषिक १००१ रुपये जाहीर केले. इयत्ता १ ली ते १०वी,१२ वी, डिप्लोमा डिग्री प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त संस्थेच्या वतीने रामोळे आय हॉस्पिटलच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर तसेच अशोका मेडिकल हॉस्पिटल च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अर्पण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी समाजातील असंख्य समाज बांधवांनी शिबिराचा लाभ घेतला.

भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाचे औचित्य साधून समाज बांधव प्रमुख पाहुणे सी.पी.साळी यांनी स्वखर्चातून समाजाच्या प्रगतीसाठी swakilsalisevasamaj@gmail.com या नावे वेबसाईट तयार करून प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते वेबसाईट लॉन्च करण्यात आली.सदर वेबसाईट चे काम मेहुल कु-हे ,संजीव रॉय,दत्ता पेंढारी, सुजित,पूर्वी परदेशी, शुभंकर मुखर्जी, आरती, रीती, तन्वी गायकवाड यांनी वेबसाईट तयार करण्यास विशेष परिश्रम घेतले.वार्षिक सभेत प्रथम समाजातील दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जन्मोत्सवाचा अन्नदान खर्च शामकांत धावणे यांनी केला त्याबद्दल सचिव सचिन चांगटे यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष सुनील ढगे यांनी धर्मदाय कार्यालयातील चेंज रिपोर्ट व बोकडदरा येथील जागेबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. खजिनदार चंद्रशेखर सरोदे यांनी मागील आर्थिक वर्षाच्या जमाखर्चाचा ताळेबंद सादर करून त्यास मंजुरी घेतली. भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवाच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विष्णुपंत बर्वे, ज्योती दिंडे, प्रकाश खंडारे, रवींद्र गायकवाड ,अनिल धारणकर ,विष्णू आचारी, रवींद्र साळी ,सतीश भानोसे,संगीता पिंगटे, सल्लागार बी.बी. बावधनकर,दिगंबर सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल.प्रमोद म्हात्रे, महेंद्र लाहोरकर, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम नियोजनासाठी महिला कार्यकारणी अध्यक्ष सौ जयश्री गायकवाड, उज्वला साळी ,मयुरी बर्वे, सोनल पिंगटे ,गौरी दिवाण ,दिपाली म्हात्रे ,मनीषा विखे ,अमृता खंडारे ,रूपाली ढगे ,ज्योती सरोदे ,योगिनी शेरे ,शुभदा चांगटे ,सुवर्णा दिंडे ,जयश्री धारणकर ,कुमोदिनी ढोरे ,शकुंतला भानोसे, उषा दिंडे, अलका जवादे आधी प्रयत्नशील होते .कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पंचक्रोशीतील नाशिक शहर पंचमंडळ,युवक उत्कर्ष संस्था ,महालक्ष्मी महिला मंडळ, सिडको विभागातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.मान्यवरा पाहुण्यांचे स्वागत व परिचय सचिन चांगटे यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी बर्वे यांनी केले.आभार प्रदर्शन कल्याणी खंडारे यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version