Home Blog प्रभाग अठरा मधील कॉलनी रस्त्यांची दुरवस्था!; निवेदनाद्वारे खड्डे बुजविण्याची मागणी

प्रभाग अठरा मधील कॉलनी रस्त्यांची दुरवस्था!; निवेदनाद्वारे खड्डे बुजविण्याची मागणी

0
296 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी
येथील प्रभाग अठरा मधील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. यामुळे वाहनधारक, पादचारी नागरिकांना त्रास सोसावा लागतो आहे. याविषयी संबंधित विभागाने दखल घेऊन तातडीने खड्डे बुजवावे, अशी मागणी असणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष योगेश निसाळ यांच्या नेतृत्वाखाली विभागीय अधिकारी त्रिभुवन यांना दिले.

यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना खड्यांची दुरवस्था असलेला छायाचित आणि शूटिंग दाखवत समस्यांचे गंभीर स्वरूप निदर्शनास आणून दिले. त्रिभुवन मॅडम यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन पाहणी करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, शहर उपाध्यक्ष गौतम पगारे, जिल्हा सरचिटणीस वजाहत शेख, बाळासाहेब जाधव,पूर्व विधानसभा अध्यक्ष सुरेखा निमसे, नाशिकरोड महिला अध्यक्षा रुपाली पाठारे, राकेश कांबळे,आशुतोष चव्हाण,अथर्व निसाळ, आकाश म्हस्के आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version