Home Blog साधना एज्युकेशन मध्ये ‘रेन डे’ उत्साहात साजरा

साधना एज्युकेशन मध्ये ‘रेन डे’ उत्साहात साजरा

0
142 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी

एकलहरे येथील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ‘रेन डे'(पाऊस दिवस) उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सचिव जयश्री गाडेकर, मुख्याध्यापिका सरला खैरनार व अंजली घोलप , शिक्षक वृंद उपस्थित होते.नर्सरी ते इयत्ता चौथी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते.

रंगीबेरंगी गोळे आणि बलूनने त्याचा उत्साह वाढविला. रेनकोट, गंबूट आणि छत्री घालण्याचा आनंद लुटला. पावसाळी गाण्यांवर जोरदार नाच गाणे केले. मजेदार आणि उत्साहाने रेन डे साजरा केला. रॉकिंग संगीताचा आनंद लुटला. यावेळी शाळेच्या मैदानावर रंगीबेरंगी छत्री सजावट करून हा दिवस साजरा करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पावसाळी प्राण्यांची (मोर, गोगलगाय, बेडूक)वेशभूषा साकारली होती.इयत्ता सातवी व आठवी रेनकोट व छत्री कलरींग उपक्रम केला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी रेन डे चा मनमुराद आनंद लुटला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version