466 Post Views
- नाशिकरोड : उमेश देशमुख
भगूर रेल्वे पुलाखाली पावसाच्या पाण्याचा डोह निर्माण झालेला आहे. वाहनधारक अन् पादचारी नागरिकांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना त्यामुळे मोठा त्रास सोसावा लागतो. नगरपालिकेने योग्यवेळी दखल घेऊन समस्या मार्गी लावावी. नाही तर नगर पालिकेला टाळे ठोकून आम्हीच पाण्याचा निचरा करु, असा इशारा राष्ट्रवादी महिला विभागाच्या नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी दिला.
