350 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीच्या रकमेवरील व्याजापोटी सन २०२४-२५ मध्ये नाशिक परिमंडळाअंतर्गत नाशिक, मालेगाव व अहिल्यानगर मंडळातील एकूण १९ लाख ७२ हजार २८७ ग्राहकांना व्याजाच्या रूपाने २६ कोटी ३४ लाख रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यात वीज बिलातून समायोजित करण्यात आला आहे.
