251 Post Views
देवळाली कॅम्प प्रतिनिधी
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील सिद्धार्थ विजय तेलोरे,गौरव भास्कर पोरजे,ओमकार संजय शेळके यांचा अग्निवीर म्हणुन भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून समावेश झाला आहे. निवड झालेले विद्यार्थी एन.सी.सी. विभागाचे असून त्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ म्हणाल्या की, अग्निवीर म्हणून निवड झालेले महाविद्यालयाचे विद्यार्थी भारतीय सैन्य, नौदल किंवा हवाई दलात सेवा देतील, राष्ट्रीय सुरक्षेत योगदान देताना मौल्यवान कौशल्ये आणि अनुभव त्यांना मिळवतील.देश सेवेसाठी मिळालेल्या संधीचे विद्यार्थी नक्कीच सोने करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी बोलून दाखवला.
एन.सी.सी.विभागाचे प्रमुख डॉ.पी.सी.गांगुर्डे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,अग्निवीर होण्यासाठी,उमेदवारांनी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक तंदुरुस्ती मानकांसह विशिष्ट पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या आणि वैद्यकीय मूल्यांकन यांचा समावेश असतो. दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा येथील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांतर्फे सत्कार करण्यात आला.
अग्निवीर झाल्याचे फायदे
– चार वर्षांच्या सेवा कालावधीत मासिक वेतन
– कौशल्य प्रमाणपत्र
– चार वर्षांनंतर कायमस्वरूपी पदांसाठी अर्ज करण्याची संधी
– सेवा निधी पॅकेज, ज्यामध्ये सेवा कालावधीच्या शेवटी एकरकमी रक्कम समाविष्ट आहे.