Home Blog निवडणुकीच्या अगोदर कॅन्सर सारखा गंभीर आजार ; पण जनतेच्या आशीर्वादामुळे निवडणूक अन्...

निवडणुकीच्या अगोदर कॅन्सर सारखा गंभीर आजार ; पण जनतेच्या आशीर्वादामुळे निवडणूक अन् आजारावर मात ! आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे प्रतिपादन

0
920 Post Views

नाशिकरोडच्या सोमाणी उद्यानाचे नुतनीकरण ; सहा महिन्यांनी आमदार ॲड. ढिकले पुन्हा सक्रिय

नाशिकरोड : उमेश देशमुख

तब्बल सहा महिन्यांनी घराबाहेर पडून पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रीय होतो आहे. विधानसभा निवडणुकी आगोदर कॅन्सर सारखा गंभीर आजार उघडकीस आला. अशा प्रतिकूल परिस्थित निवडणूक पण लढलो व जिंकलो. हे केवळ जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आहे.आपण जेंव्हा प्रामाणिक व निष्ठेने सामाजिक कर्तव्य बजावत असतो. तेंव्हा जनतेचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. ते मिळाल्यावर अशक्य उद्दिष्टे शक्य होत होत असतात करतो,असे प्रतिपादन आमदार ॲड.राहुल ढिकले यांनी केले.

नाशिकरोड परिसरातील सोमाणी उद्यानाचे नुतनीकरण व लोकार्पण सोहळा रविवारी ( दि.२० ) सायंकाळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला करवा यांचे हस्ते व आमदार ॲड.ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या निधीतुन नुतणीकरण झालेले सोमाणी उद्यान आज सर्वासाठी खुले झाल्याबद्दल करवा यांनी आभार मानले.करण्यात आले आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक रमेश धोंगडे, विशाल संगमनेरे,अंबादास पगारे, माजी नगरसेविका मीरा हांडगे, ज्योती खोले, कोमल महरोलिया, अशोक तापडिया, शंकरराव मंडलीक, रणजितसिंग आनंद, शिवनारायण सोमाणी, अण्णा आढाव, किरण मेंद, राम कदम, युनूस सैय्यद, मयुरी करवा, मंगेश मोरे, अशोक गवळी, कमलकिशोर करवा, किरण देशमुख, धिरज पाटील, रोहित पानसरे, मंगेश जानोरकर आदी. उपस्थित होते.सुत्रसंचलन राजेश आढाव यांनी केले.

उद्यानाचे वैशिष्ट्ये असे

उद्यानात २६ फुट उंच डायनासोर, १५ फुट हल्क प्राणी, पक्षी, विद्यृत रोषणाईने सजलेले विविध खेळणी, गाण्यावर संगीतावर कारंजा, कारंजातुन अंगावर पडणारे पाण्याचे तुषार, तसेच दाट हिरवळी मुळे सोमाणी उद्यानाच्या सौंदर्यात भर पडल्याचे दिसते.

बाळ गोपाळांची गर्दी होणार

मागील अनेक दिवसांपासून नाशिक रोड येथील सोमाणी उद्यानाचे नूतनीकरण व्हावे, अशी सामान्य जनतेची मागणी होती.आमदार ढिकले यांनी मागणीची दखल घेतली. सोमाणी उद्यानात आकर्षक विद्युत रोषणाई केली. लक्षवेधक संगीत कारंजा, आदि. सजावट उद्यानात केली.त्यामुळे लवकरच सोमाणी उद्यानात बच्चे कंपनीची गर्दी होणे अपेक्षित आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version