Home Blog नाशिकरोड मध्ये साकारला मध्य प्रदेशातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महू येथील जन्म भूमीचा...

नाशिकरोड मध्ये साकारला मध्य प्रदेशातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महू येथील जन्म भूमीचा आकर्षक देखावा

0
443 Post Views

देखावा पाहण्यासाठी सामान्य जनतेसाठी  खुला

नाशिकरोड : उमेश देशमुख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भीम जन्मभूमी महुचा देखावा तयार झाला आहे. महात्मा फुले जयंतीदिनी तो नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. मध्य प्रदेशातील महू येथील बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचे प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा आहे.

रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते देखाव्याचे उदघाटन झाले. जयंती समिती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस राहुल पगारे, खजिनदार विजय पवार, संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, हरीश भडांगे, अमोल पगारे, शेखर भालेराव, सनी वाघ, आकाश भालेराव, संतोष पाटील, रामबाबा पठारे, नयना वाघ, संतोष कांबळे, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, राजाभाऊ वानखेडे, चंद्रकांत भालेराव, संजय भालेराव, रोहित निरभवणे, विशाल घेगडमल, आकाश घुसळे, राजू पगारे, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, कैलास वानखेडे, बाळासाहेब जाधव, बौद्धाचार्य प्रवीण बागुल, चावदास भालेराव, प्रभाकर कांबळे, पी‌. के गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, भीमचंद चंद्रमोरे, कुणाल कांबळे, माधुरी भोळे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, विमलबाई तडवी, विमलबाई जाधव आदी उपस्थित होते

नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक देखावा ठरणार

संपूर्ण नाशिक जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जोश पूर्ण वातावरणात नाशिक रोड मध्ये साजरी केली जाते. असा आजवरचा अनुभव आहे.डॉ. आंबेडकर जयंतीला सर्वाधिक गर्दी होण्याचे ठिकाण म्हणजे नाशिक रोड मानले जाते. दरवर्षी विविध कार्यक्रम आणि उत्कृष्ट देखावा साजरा केला जातो. यंदा देखील उत्सव समितीने ऐतिहासिक देखावा सादर केला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म भूमीचा आकर्षक देखावा सादर करून समितीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. देखावा ३२ फूट लांब व ४५ फूट उंच आहे. मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजीसकर यांनी देखाव्याचे काम केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version