741 Post Views
इगतपुरी तालुक्यातील नवनियुक्त न्यायाधिश वाजे,जाधव यांचा तालुका समाज विकास फाउंडेशन तर्फे गौरव
इगतपुरी तालुका: विक्रम पासलकर
अस म्हणतात जिद्द असली की कोणतेही यश मिळाल्याशिवाय राहत नाही. जिद्दीला सलाम ठोकावे असेच यश इगतपुरी तालुक्यातील दोन युवकांनी आपल्या कणखर कष्टाला गवसणी घालून मिळवले आहे. घोटी येथील वाजे कृषी सेवा केंद्राचे संचालक आणि श्रीक्षेत्र खेडभैरव येथील शेतकरी अरूण वाळूजी वाजे यांचे सुपुत्र विवेक आणि घोटी बाजार समितित भाजीपाला विक्रेते म्हणून गेली पंचविस वर्ष व्यवसाय करणारे पांडुरंग जाधव यांचे चिरंजीव अंकुश या वाजे आणि जाधव परिवाराच्या दोन्ही शिलेदारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2020 अंतर्गत दिवाणी न्यायाधीश कंनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग या कक्षेत येणाऱ्या अवघड परीक्षेत उत्तुंग यश मिळवून मोठे यश संपादन केले आहे.
