येथील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संस्थापिका स्व.सौ.सत्यभामाताई लक्ष्मण गाडेकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी ( दि. ९ ) साधना मॅरेथॉन पार पडली. यामध्ये विर भालेराव, विधी कुलकर्णी, सूर्यकांत भोसले, छाया वाघ आदींनी प्रथम क्रमांक पटकावला. विश्वस्त योगेश गाडेकर यांनी आयोजन केले होते.
खेळाडू व मान्यवरांचे स्वागत ढोल पथकाने केले. पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप,आंतरराष्ट्रीय धावपटू तानाजी भोर , संस्थेचे अध्यक्ष पल्लवी गाडेकर,उपाध्यक्ष मनीषा वजरे,सचिव जयश्री गाडेकर, संचालक सदस्य जया रौंदाळे विश्वस्त योगेश गाडेकर,विशाल गाडेकर शाळेच्या मुख्याध्यापिका सरला खैरनार व अंजली घोलप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर धावपटूंचा झुंबाच्या ठेक्यावर वार्म-अप घेण्यात आला. मॅरेथॉन नंतर कूल डाउन सेशन देखील घेण्यात आले.निर्मल शेठ भंडारी(भंडारी ज्वेलर्स),मनोज म्हस्के(राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक),रमेश वैद्य(माजी क्रिकेटपटू,रणजी क्रिकेट),विनीत पिंगळे (साधना एज्युकेशनचे शुभचिंतक) या सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या धावपटूंचा मेडल व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक अश्विन भालेराव व शिक्षिका अश्विनी ताजनपुरे यांनी केले.
मॅरेथॉन विजेते वयोगटानुसार
१४ वर्षा आतील मुले १) वीर सुनील भालेराव २) गौरव शैलेश तांडवडी, १४ वर्षा आतील मुली १) विधी कुलकर्णी २) आर्या लहरे, १७ वर्षा आतील मुले १) आदित्य हगवणे २) अविनाश गावित, १७ वर्षा आतील मुली १) दिपाली रमेश पाटील २) जान्हवी विजय सोनवणे, २९ वर्षा आतील मुले १) सौरभ भुके २) गोकुळ गेनु लिलके, २९ वर्षा आतील मुली १) कीर्ती ज्ञानेश्वर खाडे,२) अदिती सुदाम इंदरखे, ३९ वर्षा आतील पुरुष १) रवींद्र दिलीप पवार,२) निवारुती पवार, ३९ वर्षा आतील महिला १) सविता विठ्ठल पाटील,२) सोमण ठाकूर, ५९ वर्षा आतील पुरुष १) रोहिदास गणपत घोलप २) सनलोश घेगडमल, ५९ वर्षा आतील महिला १) सोनाली विश्वजितसिंग राजपूत २) स्नेहल डार्ले, ६०वर्षा आतील पुरुष १) सूर्यकांत दामोदर भोसले २) चंद्रकांत सीताराम पाळदे , ६० वर्षा आतील महिला १) छाया वाघ २) वैशाली पिंगळे