Home Blog सिन्नर फाटा चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारा ! ;...

सिन्नर फाटा चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारा ! ; शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन

0
485 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

पूर्वेकडील नाशिक शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर फाटा चौकात वाहतूक बेट प्रस्तावित आहे. बेटावर छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा,अश्या मागणीचे निवेदन नाशिक रोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश गाडेकर तसेच पदाधिकारी व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा, छत्रपती संभाजी महाराज यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य आणि कर्तुत्व याची दखल महापालिका प्रशासनाने घ्यावी.सिन्नर फाटा येथील प्रस्तावित वाहतूक बेटावर त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा. अश्वारूढ पुतळ्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होईल. त्याचप्रमाणे तरुण पिढीला छत्रपती संभाजी महाराज यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव होईल. महापालिका प्रशासनाने शिवजन्मोत्सव समितीच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा सिन्नर फाटा येथे उभारावा अशी मागणी निवेदनात केलेली आहे.

यांनी दिले निवेदन

निवेदनावर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर, कार्याध्यक्ष सुनील सोनवणे, उपाध्यक्ष राहुल लवटे, विशाल सातभाई, सरचिटणीस प्रशांत कळमकर, चिटणीस गोकुळ नागरे,खजिनदार अभय खालकर तसेच शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष विकास ( बंटी) भागवत, राजेश फोकणे, विशाल संगमनेरे,विक्रम कोठुळे, किशोर जाचक, कृष्णा लवटे, शिवाजी हंडोरे तसेच सदस्य नितीन चिडे,दर्शन सोनवणे, साहेबराव शिंदे, योगेश भोर, नितीन खर्जुल,राहुल ताजनपुरे, संतोष क्षीरसागर, शांताराम घंटे, मिलिंद माळवे, सचिन कोठुळे, शंतनू निसाळ, बापू सातपुते,निलेश कर्डिले, राहुल वाजे, लकी ढोकणे, तुषार फडोळ,संदीप वाळके, कैलास मालूजकर, राहुल शहाणे, गणेश डावरे,विजय जाधव,विजय कदम आदींचे नावे आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version