201 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
कॅनॉल रोड ,इंगळे नगर ते उपनगर नाका रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काॅग्रेसच्या वतीने महापालिका नाशिक रोड विभागीय अधिकारी चंदन घुगे यांना नुकतेच देण्यात आले.मागील अनेक दिवसांपासून येथील वाहनधारक अन् नागरिक रस्त्याच्या समस्याने त्रस्त झालेले आहे.

जेलरोड कॅनॉल रोड इंगळे नगर ते उपनगर नाक्या पर्यंत रस्ता जलवाहिनी टाकण्यासाठी खोद काम करून ठेवलेला आहे. रस्त्यावरील मातीच्या धुळीचे त्रास येथील राहिवासी, वाहनधारक, पादाचाऱ्यांना होत आहेत, सदर धुळीच्या साम्राजामुळे नागरीकांना श्वसनाचा व डोळ्याचा विकाराचा भयंकर रित्या त्रास सुरू झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे अनेक नागरीक अपघातांना बळी पडले आहेत. त्वरीत या रस्ताचे डांबरीकरण करावे. तसेच नाशिक पुणे मार्गावर् सेंट झेविअर शाळेजवळ अत्याधुनिक पध्दतीचे स्पिड ब्रेकर टाकावे.निवेदनावर मुन्नाभाई भन्सारी, सचिन आहेर, राजाभाऊ जाधव, संतोष गाडेकर, अकील काद्री, प्रवीण बैसाणे, विनोद रोड्रिक्स संजय सौदे, प्रविण बोराडे, गणेश मोरे, मनोज लोळगे आदींची नावे आहेत.

जेलरोड कॉलनी रस्त्यांची दुरवस्था
येथील कॉलनी रस्त्यांची दुरवस्था अतिशय बिकट झालेली दिसते. नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे संबधित अधिकाऱ्याकडे तक्रार करावी लागते. तक्रार केल्यावर अधिकारी दखल घेत नाही. त्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर निवेदन देण्याची वेळ आलेली आहे.