Home Blog देवळाली कॅम्प परिसरातील बारावी विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था जाहीर ; अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात

देवळाली कॅम्प परिसरातील बारावी विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था जाहीर ; अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात

0
580 Post Views

देवळाली कॅम्प, प्रतिनिधी

येथील केंद्र क्रमांक ०१२५ असलेल्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील इयत्ता बारावी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर झाली आहे. यंदा केंद्रात एकूण ८४६ परीक्षार्थी विद्यार्थी आहे. ११ फ्रेबुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत परीक्षा होईल.

आसन व्यवस्था याप्रमाणे आहे.
कला व उर्दु शाखेचे बैठक क्रमांक असे एस. ०९५८१७ ते एस. ०९६०५१
विज्ञान शाखेतील बैठक क्रमांक असे एस. ०१०१११ ते एस. ०१०४०८
एच.एस.व्ही.सी शाखेतील बैठक क्रमांक एस. १६४४७६ ते एस.१६४५२४
तसेच बैठक क्रमांक एस.४००१६१, एस.४००१६३, एस.४००१६४ या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयासाठीची आसन व्यवस्था श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात करण्यात आलेली आहे.

वाणिज्य शाखेतील बैठक क्रमांक एस. १५१६०३ ते एस. १५१८५९ या विद्यार्थ्यांची इंग्रजी या विषयाची आसन व्यवस्था डॉ. गुजर सुभाष हायस्कूल व ज्यु. कॉलेज येथे करण्यात आलेली आहे. इंग्रजी विषयाचा अपवाद वगळता इतर विषयांची आसन व्यवस्था श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात करण्यात आलेली आहे.

परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी केंद्रप्रमुख प्रा. सोपान पवार, उपकेंद्रप्रमुख प्रा. शशिकांत अमृतकर, प्रा. नंदलाल जाधव, प्रा. अनिल गवळी यांच्यासोबत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version