अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक व पुणे येथील खेड,राजगुरुनगर शहरात मोफत मराठा वधू-वर मेळावे आयोजित केले असून समाज बांधवानी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बंटी भागवत, मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे, डॉ. संजयकुमार गायधनी, डी जी पाटील, शरद जगताप, योगेश पाटील यांनी केले आहे.
अखंड मराठा समाज, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी बारा वाजता, कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, (मविप्र संस्था ) गंगापूर रोड, नाशिक शहर येथे ९३ वा व पुणे जिल्ह्यात रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता राजगुरुनगर, खेड, जुना घाट, हॉटेल साईराज मंगल कार्यालय येथे ९४ वा मोफत वधू वर मेळावेआयोजित केले आहेत. नाशिकमधील मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील उत्तमराव ढिकले आणि संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे उपस्थित राहणार आहे.
चार हजार विवाहाछाचे संयोजन
आतापर्यंत संस्थेच्या आयोजनाद्वारे जवळपास ४ हजार पेक्षा अधिक विवाह जमेलेले आहे. यापैकी ६१३ विवाहमध्ये विधवा आणि ९२ घटस्फोटीत वधू वर मेळाव्याचा सामावेश आहे. मराठा सोयरीक संस्था गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक भावनेतून लग्न जमवण्याचे कार्य करत आहे. पुणे आणि नाशिक मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून, अनेक वधू-वर पालक उपस्थित राहतील. मेळाव्यास येताना मुला, मुलींनी स्वतः पालकांसोबत येऊन बायोडाटा व आधार कार्ड यांची झेरॉक्स आणणे गरजेचं आहे. अगोदर नाव नोंदणी करण्याची गरज नाही. मेळाव्यात सहभाग घेऊन नाव नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क 8453902222 या मोबाईलवर क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. मेळाव्यामध्ये समोरासमोर स्थळे बघून एकमेकांसोबत बोलण्याची संधी मिळणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी दोन्ही मेळाव्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जयश्री कुटे, ज्ञानेश्वर कवडे, प्रा.शंकरराव सोमवंशी, प्रा.राजाराम मुंगसे, डॉ.प्रतापराव कोठावळे पाटील, चंद्रभान मते, शिवाजी हांडोरे, चेतन शेलार, धनंजय घोरपडे,चिंतेश्वर देवरे, दिपाली चव्हाण यांनी केले आहे.