लोकशाही असलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणुन भारताकडे पाहीले जाते. आजही भारातील सर्व नागरिकांचा लोकशाहीवर अतूट विश्वास आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संविधान आहे. त्यामुळेच आज आपल्याला लोकशाही बळकट असल्याचे दिसून येते. असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी केले.
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात रविवारी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा झाला. त्यावेळी झालेल्या ध्वजारोहण प्रसंगी प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ बोलत होत्या. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड उपस्थित होते. यावेळी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.एन.सी.सी. विभागाचे प्रमुख पी.सी. गांगुर्डे, क्रिडा शिक्षक नामदेव काकड, सुनिल देवरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. याप्रसंगी मविप्रच्या सभासद कौशल्या मुळाणे, ज्ञानेश्वर पाळदे, रमेश धोंगडे, माणिक गोडसे, बाबुराव मोजाड, औचित फडोळ, शिवाजी गायधनी, सुर्यभान गायधनी, संजय सोनवणे, कचरु आडके, रघुनाथ देवकर, उप प्राचार्य डॉ. डी.टी.जाधव,सुनिता आडके आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.