Home Blog भगूरला तेली समाजाच्या तर्फे भव्य हळदी – कुंकू सोहळा दिमाखात साजरा

भगूरला तेली समाजाच्या तर्फे भव्य हळदी – कुंकू सोहळा दिमाखात साजरा

0
339 Post Views

भगुर : दीपक कणसे

भगुर शहर तेली समाजाच्या वतीने जय संताजी महिला मंडळाच्या माध्यमातून येथील तेली समाज मंगल कार्यालयात भव्य हळदीकुंकू सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भगुर शहर तेली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मनीषाताई कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला. भगूर शहर तेली समाजाच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे तेली समाज भूषण असलेले माजी उपनगराध्यक्ष सुदाम वालझाडे,नगरसेवक पद्माकर शिरसाठ, चेतन बागडे,पांडुरंग आंबेकर, राजाभाऊ आंबेकर,डॉ.सुनीताताई बोरसे,शोभा भागवत,सुरेखा शिरसाठ सुलोचना वालझाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हातून समाज भूषण संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्याध्यक्ष योगिता मोरे,रेखा शिंदे,उपाध्यक्ष प्राजक्ता बागडे,सुरेखा कोरडे,आशा बागडे,सचिव मीनाक्षी गायकवाड,ज्योती वालझाडे,रेणुका गायकवाड,मोहिनी वालझाडे,मनीषा महाले,ज्योती भागवत,नूतन शिंदे,आरती गायकवाड,जागृती गोरे,मोनिका कस्तुरे,अनुराधा दिवटे,कल्पना गोरे,सुनंदा कस्तुरे,स्वाती काळे,दिपाली वालझाडे,शितल वालझाडे,वैशाली कस्तुरे,पूजा बागडे,मंदा वालझाडे,उर्मिला महाले,गंगा कस्तुरे,वैशाली ससाने,लता वालझाडे,शोभाताई भागवत सह भगूर मधील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी माजी नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान महिलांचे विविध खेळ घेण्यात आले. यामध्ये एक मिनिटात जास्तीत जास्त फुगे फोडणे,बुद्धिमत्ता चाचणी,ऐनवेळी आलेल्या विषयावर बोलणे अशा विविध प्रकारचे खेळ खेळून महिलांनी मोठ्या प्रमाणात आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना वानरूपी गोडवा वाटण्यात आला. सर्व महिलांनी संक्रातीचे हळदी कुंकवाचे वाण आनंदाने लुटले. आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणून एकमेकींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष रेखा शिंदे यांनी केले तसेच आभार योगिता मोरे यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version