पौष वारीनिमित्त त्र्यंबकेश्वरला जाऊन संत निवृत्तीनाथांच्या दर्शन घेण्याची ओढ अनेकांना असते.पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यामुळे जे वारकरी मनोभावे संत निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी दरवर्षी पायी वारी करतात, त्यांची सेवा करावी आणि काकणभर पुण्य मिळवावे, अशी भावना बाळगणारे खूप असतात.
विश्वगुरू संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पौष वारी ( यात्रा )उद्या शनिवार दि २५ जानेवारी रोजी पार पड़त आहे. या निमित्त मैलोन मैल चा दूरवरुन प्रवास करून हजारोच्या संख्येने वारकरी त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत आहेत. याच पौष वारीनिमित्त वारीमय जग, सेवा हाच धर्म या ओळीनुसार धनश्री आदिवासी विकास प्रतिष्ठान व वृंदावन हॉस्पिटल प्रा.लि. पाथर्डी फाटा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा आणि औषधोपचार देण्यात येत असते. या सेवेमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.या वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी डॉ. शरद तळपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम कार्यरत असून वारकऱ्यांना उत्कृष्टपणे आरोग्यसेवा या टीमच्या माध्यमातून मिळत आहे..! या निमित्ताने डॉ. तळपाडे व त्यांच्या टिमचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.