720 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नाशिकरोड शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे युवा नेते योगेश गाडेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यादरम्यान देवळाली गावात मोफत आरोग्य निदान शिबिर झाले. पाचशे नागरिकांनी लाभ घेतला. रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक रोड व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी शिबीराचे उदघाटन केले.
