Home नाशिक इगतपुरी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर ! ; फेब्रूवारी महिन्यात...

इगतपुरी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर ! ; फेब्रूवारी महिन्यात ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रंगणार रणधुमाळी

0
476 Post Views

इगतपुरी : विक्रम पासलकर

गेल्या अनेक महिन्यांपासुन प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या तालुक्यातील सुमारे ६४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढील महिन्यात घोषित होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त होत असल्यामुळे मंगळवार दि २१ रोजी इगतपुरी चे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता तालुक्यातील ६४ पैकी सुमारे २३ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या नंतर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक जण सरपंच होण्यासाठी तर काही जण ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून केव्हाच बसलेले दिसत आहे. त्यात मंगळवारी तालुक्यातील काही संवेदनशील तर काही अतिसंवेदनशील ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाचे आरक्षण सोयी नुसार पडल्याने त्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे,मात्र ज्यांनी तयारी करून देखील त्यांच्या प्रवर्गाचे आरक्षण न पडल्याने अशा इच्छुकांना जोर का झटका बसला असल्याचे दिसून येत आहे. आतापासूनच कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी आणि गावपातळीवर आपली सत्ता घेण्यासाठी पॅनल निर्मितीच्या हालचाली राजकीय नेत्यांनी गतीमान केल्या आहेत.

तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीचे आरक्षण आणि जातीनिहाय प्रवर्गाची लोकसंख्या अशी आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version