Home Blog नाशिकरोडला ऋतुरंग महोत्सवाची यशस्वी व उत्साहात सांगता ; आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांनी गाजला महोत्सव

नाशिकरोडला ऋतुरंग महोत्सवाची यशस्वी व उत्साहात सांगता ; आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांनी गाजला महोत्सव

0
405 Post Views

नाशिक रोड : उमेश देशमुख

सांस्कृतिक कार्यक्रम, कलाप्रदर्शन, व्याख्याने, संगीत रजनी अशी आगळी वेगळी मेजवानी देणा-या तीन दिवसांच्या ऋतुरंग महोत्सवाची रविवारी यशस्वी व उत्साहात सांगता झाली. रविवारी श्रीराम कथक मानस या अनोख्या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्यातून प्रभू रामचंद्रांचा सुंदर असा चरित्रपट उभा राहिला. प्रसिद्ध नृत्यांगना किर्ती भवाळकर व त्यांच्या शिष्यांनी केलेल्या या सादरीकरणाला रसिकांनी मनारपासून दाद दिली.

रौप्य महोत्सव साजरे करणा-या, नाशिक रोडला सांस्कृतिक चेहरा देणा-या ऋतुरंगतर्फे यंदा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात शिल्प व चित्रकला प्रदर्शन, व्याख्यान, संगीत आदी भरगच्च कार्यक्रम झाले. रविवारी श्रीराम कथक मानस कार्यक्रम झाला. नाशिक रोड व्यापारी बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, ऋतुरंगचे अध्यक्ष विजय संकलेचा, संतोष जोशी, वसंत नगरकर, प्रकाश पाटील, तन्वी अमित, मोहन लाहोटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.किर्ती भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी पुजारी, रिया भावसार, श्रावणी पुराणिक, वसुंधरा आहेर, अनुष्का गोखले, अव्दिका महाजन आदींनी नृत्याव्दारे आकर्षक पध्दतीने रामायणातील प्रसंगांचे सादरीकरण केले. श्रीराम चरित मानस श्लोकाने सुरूवात झाली. ठुमक चलत रामचंद्र…, राम का गुण गानकरिय…,पायोजी मैंने राम रतन धन पायो…,राम चरण सुख दाई…, ऐसे राम है दुख हरण…, श्री रामचंद्र कृपालू भजमन… आदी गीतांतून नृत्याव्दारे राम कथा सादर करण्यात आली. स्वानंद बेदरकर यांनी बहारदार निवेदन केले.शेवटचा दिवस असल्याने प्रदर्शन व कार्यक्रमाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. ऋतुरंग परिवाराचे भागवत माळी, शेखर कावळे, सुभाष पाटील, गीता पाटील, सुरेश गवंडर, अशोक भाबड, नितीन क्षेत्रीय, अरविंद क्षीरसागर, वास्तुविशारद रवि पारुंडेकर, पुष्पा गवादे, कल्पेश लोया, संजीव हाजीरनिस, अशोक आरिंगळे, राजेंद्र शिरसाठ, प्रभास जोशी, सचिन पावसे, मुकूंद महाले, मधुकर परदेशी, प्रदीप लोहारकर, निरंजन नगरकर आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version