Home Blog ‘देवळाली रन’ मध्ये अतुल बेर्डे, सुरज पाटोळे, हर्षद नेटावटे, दिव्या जुंद्रे, कल्याणी...

‘देवळाली रन’ मध्ये अतुल बेर्डे, सुरज पाटोळे, हर्षद नेटावटे, दिव्या जुंद्रे, कल्याणी शेळके अव्वल ; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

0
557 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

देवळालीतील कलाकार व खेळाडूंना पर्वणी ठरलेल्या देवळाली महोत्सवाचा समारोप रविवारी ( दि. १९ ) देवळाली रन ने झाला. यामध्ये अतुल बेर्डे, सुरज पाटोळे, हर्षद नेटावटे, दिव्या जुंद्रे, कल्याणी शेळके यांनी अव्वल क्रमांक पटकावला. मविप्रचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे आदींनी हिरवा झेंडा दाखवत देवळाली रन ला सुरुवात केली. मान्यवरांच्या हस्ते देवळाली महोत्सवात आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविले. यंदा देवळाली महोत्सवाचे तेरावे वर्ष आहे. नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे उत्साह वाढतो, अशी प्रतिक्रिया आयोजक जीवन गायकवाड यांनी दिली.

जुन्या बस स्थानक परिसरात देवळाली फेस्टिवलच्या ‘देवळाली रन’ ला सकाळी सुरुवात झाली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, नाशिक जिल्हा क्रीडा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. दीपक जुंद्रे, सायकलिस्ट नलिनी कड, रमेश शाह, परमजितसिंग कोचर, खंडेराव मेढे,कौसल्या मुळाणे, मीना पाटील, छाया हाबडे आदी मान्यवरांनी झेंडा दाखवून देवळाली रनचा शुभारंभ केला. या रनमध्ये १४, १७ व खुला अशा गटात मुले व मुली अशी स्पर्धा पार पडली. दरम्यान मंचावर सामूहिक नृत्य स्पर्धेत इंग्लिश प्रेप स्कुलचे रामायण व नूतन प्राथमिक विद्या मंदिर भगूरच्या प्राथमिक विद्या मंदिराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील गाण्यावर नृत्य सादर केले. यानंतर लगेचच पार पडलेल्या पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख अतिथी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड, संदीप शिंदे, संतोष घोडे, मंगेश गुप्ता, दीपक बलकवडे,प्रमोद मोजाड, निलेश बंगाली, पंकज शेलार, संदीप चौधरी, नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थितीत चित्रकला, गडकिल्ले, सामूहिक नृत्य व देवळाली रन मधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.प्रास्ताविकातून जीवन गायकवाड यांनी गत १३ वर्षातील उपक्रमांचा आढाव घेतला. या रन मधील खुल्या गटात शिगवे बहुला येथील अतुल बर्डे व १७ वर्ष वयोगटात दिव्या जुंद्रे हे विजेते ठरले. त्यानंतर क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे क्रीडा प्रशिक्षक संजय माथूर, संग्राम गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. आनंद कस्तुरे यांनी सूत्रसंचालन तर प्रशांत धिवंदे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी मनोज कनोजिया, कृष्णा लोखंडे, लक्ष्मण मुसळे, राजेंद्र यशवंते,अनिल ढोकणे,भाऊसाहेब शिंदे, बाळकृष्ण घोलप, राम धोंगडे, योगेश्वर मोजाड, संजय माथूर,जनार्दन बोडके,संतोष पिंपळे, केशव गोजरे, हेमंत गायकवाड, राम गोडे,गोरख झोंबाड,अनिल भोर,आकाश बोराडे,विनोद डांगे,रोशन वाजे, राकेश कलाल यांचेसह परिसरातील सर्व शाळांचे शिक्षक प्रयत्नशील होते.

रनमधील विजेते स्पर्धक :-
खुला गट (पुरुष) – प्रथम- अतुल बर्डे, द्वितीय- कार्तिक कुमार , तृतीय- रवींद्र पवार.
१७ वयोगट (मुले) -प्रथम- सुरज पाटोळे, द्वितीय- वीर भालेराव, तृतीय- उदय गायकवाड.
१४ वयोगट (मुले)- प्रथम- हर्षद नेटावटे, द्वितीय- मुकेश आर्य,तृतीय- मोहन लगड.
१७ वयोगट (मुली) -प्रथम – दिव्या जुंद्रे , द्वितीय- कोमल रोकडे, तृतीय- आश्विनी शिंदे.
१४ वयोगट (मुली) – प्रथम- कल्याणी शेळके, द्वितीय- आरोही बरकले,तृतीय- पूजा शिंदे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version