Home Blog वृत्तपत्रातील अग्रलेखामुळे समाजात प्रबोधन !;शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांचे प्रतिपादन

वृत्तपत्रातील अग्रलेखामुळे समाजात प्रबोधन !;शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांचे प्रतिपादन

0
401 Post Views

देवळाली कॅम्प, प्रतिनिधी

अग्रलेख वृत्तपत्रांचा आरसा असतात. समाजातील चांगल्या वाईट घटनांवर प्रकाशझोत टाकून प्रबोधन करण्याचे काम वृत्तपत्रातील अग्रलेख सातत्याने करीत आले आहेत. असे प्रतिनादन एसव्हीकेटी कॉलेजच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांनी केले.

येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्काराच्या कार्याक्रमा प्रसंगी विलास धुर्जड बोलत होते. प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, जगभरात सुरु असलेल्या विविध घटना, घडामोडी समाजात योग्य पध्दतीने मांडण्याचे काम प्रसिध्दी माध्यमे करतांना दिसतात. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स मीडीयाप्रमाणे आज सोशल मिडयाचा देखील प्रभाव वाढतो आहे. त्यामागे देखील पत्रकारांची भुमिका महत्वाची असल्याचे प्रचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी सांगीतले. याप्रसंगी नाशिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार, प्रविण आडके, प्रशांत दिवंधे, भगूर देवळाली कॅम्प पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर, संजय निकम, दिपक कणसे, प्रविण बिडवे, अरुण तुपे, संदीप नवसे, भैय्यासाहेब कटारे, संतोष भावसार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सतीश कावळे यांनी केले. आभार नाशिक मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी मानले

.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version