580 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
येथील जय भवानी रोडवरील तुळजाभवानी मंदिरात मंगळवार ( दि.७ ) पासून शाकंभरी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली. दरम्यान उत्सवाला नाशिकरोड व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतील अशी शक्यता आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा अशी – मंगळवार (दि.७) पहाटे देवीची प्रतिष्ठापना व घटस्थापना. बुधवार (दि.८) देवीची अलंकार महापुजा आणि रात्री छबीना. गुरूवार (दि.९) देवीची महापूजा. शुक्रवार (दि.१०) देवीची शेषशाही महापूजा आणि रात्री छबीना. शनिवार (दि.११) सकाळी जलयात्रा आणि भवानी तलवार महापुजा. रविवार (दि.१२) अग्नीस्थापना, होम हवन, नित्योपचार पुजा. सोमवारी (दि.१३) शाकंभरी पोर्णिमा, पुर्णाहुती, घटोत्थापन. मंगळवार (दि.१४) दुपारी महाप्रसाद, रात्री मकरसंक्रात पंचांग श्रवण. दररोज सकाळी व संध्याकाळी साडे सातला आरती होणार आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे वर्षभरात शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र व शाकंभरी नवरात्र असे तीन वेळा नवरात्र उत्सव साजरे केले जातात. त्या प्रमाणे जयभवानी रोडवरील तुळजाभवानी मंदिरात तीनही नवरात्र उत्सव साजरा करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळांनी घेतलेला आहे.
नांदूर मानूर परिसरात शासकीय मान्यता प्राप्त असलेली विश्वास पात्र एकमेव महारुद्र नर्सरी
