नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी नाशिक रोड परिसरातील महाविकास आघाडीचे सर्व सदस्य जोमाने प्रचार करताना दिसून येत आहे. मागील एक महिन्यापासून वाजे यांचा प्रचार सुरु आहे. नाशिक रोड परिसरातील प्रत्येक छोट्या मोठ्या बाजारपेठेवर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केल्या आहे. बाजारपेठे मधील सर्वच प्रकारच्या व्यवसायिकांसोबत थेट प्रत्यक्ष संपर्क साधून प्रचार केला जातो आहे.
अगदी फळ विक्रेते भाजी विक्रेते तसेच रस्त्यावरील वेगवेगळा व्यवसाय करणारे स्टॉल धारक यांना वाजे यांच्या विजयासाठी साकडे घातले जात असल्याचे चित्र दिसते आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा नाशिक रोड परिसरात तळागाळात प्रचार सुरू आहे. यासाठी महाविकास आघाडी मधील सर्व पक्ष म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आदी. पदाधिकारी एकवटुन प्रचारासाठी भिडलेले दिसत आहे.