654 Post Views
नाशिकरोड : प्रतिनिधी
मानवी जीवनामध्ये स्वतःला आकार देण्यासाठी ग्रंथांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. प्रत्येकाने जीवनामध्ये वाचन केले पाहिजे. ग्रंथांमध्ये जीवनाच्या अनुभूती असतात.वाचनाने माणसे घडतात.असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. प्रतिमा पंडीत वाघ यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात बुधवारी ( दि.१ ) महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन व वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्राचार्या वाघ बोलत होत्या. व्यासपीठावर सुभाष वाचनालय विहितगाव वाचनालयाचे अध्यक्ष कैलास हांडोरे तसेच शिवाजी हांडोरे, संदीप डुंबरे,कवी शिवाजी पगार, महेंद्र पांगारकर, श्रीकांत हांडोरे,पोपटराव पोरजे,अमर जमधडे, दिनेश हांडोरे, लता हांडोरे, समन्वयक उपप्राचार्य डॉ. दिलीप जाधव, श्रीमती सविता आहेर, सतीश कावळे, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प व सुभाष वाचनालय व ग्रंथालय विहित गाव यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात सामूहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नांदूर मानुर परिसरात शासकीय मान्यता प्राप्त महारुद्र नर्सरी / रोपवाटीका
