315 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
पीपल्स रिपब्लिकन पार्टीची बैठक नुकतीच येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष लॉन्ग मार्चचे प्रणेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या उपस्थितीत आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय कायदे सल्लागार कमिटीच्या अध्यक्षपदी अँड. शशिकांत उन्हवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योगाचे नवनिर्वाचित उपाध्यक्षपदी निवड झालेले पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांचा जाहीर सत्कार झाला.
