शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक संघाच्या संघटनात्मक कार्यात महिलांचा सहभाग महत्वाचा असून तो वाढवण्यासाठी संघ सैनिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी केले.
नाशिक येथील रॉयल हेरिटेज सभागृहात रविवारी ( दि.29 ) रोजी शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांचे उपस्थितीत नाशिक जिल्हा शिक्षक संघाची सभा संपन्न झाली. यावेळी बोलतांना राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी सांगितले की, शिक्षक संघाने वाडी वस्तीवर जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत. राज्यातील शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे, मुख्यालयाची अट रद्द करणे, जिल्हा व राज्य गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवेढी सुरू कराव्यात आदी मागण्यासाठी राज्य स्तरावर शिक्षक संघ भक्कमपणे लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नाशिक जिल्हयाला तीन कॅबीनेट मंत्रीपद दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी विभागीय अध्यक्ष पृथ्वीबाबा शिरसाठ यांनी जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न व शिक्षक संघाच्या कामकाजा बाबत माहिती दिली. जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे यांनी प्रास्तविकात जिल्हा शिक्षक संघाचे ध्येय धोरणे स्पष्ट केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राज्य शिक्षक संघाचे सरचिटणीस आबासाहेब जगताप , राष्ट्रीय महासंघाचे सचिव बाळासाहेब झावरे, कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, कोषाध्यक्ष उत्तम वायाळ, राज्य उपाध्यक्ष युवराज पवार, जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता पवार , विभागीय अध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, अर्जून ताकाटे , बाजीराव सोनवणे, रविंद्र थोरात, रामदास शिंदे , धनराज वाणी, प्रमोद शिरसाठ, चंद्रकांत सावकार, प्रदिप शिंदे , निवृत्ती नाठे , निंबा बोरसे , प्रदीप मोरे , चंद्रकांत महाजन, जिभाऊ निकम , आप्पा खैरनार, पुरुषोत्तम इंगळे , शांताराम काकड , विश्वास भवर , विनायक ठोंबरे , धनंजय आहेर , सचिन वडजे, बाजीराव कमानकर, बाळासाहेब धाकराव रविंद्र देवरे, भाऊसाहेब पगारे ,यांचेसह महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राष्ट्रीय, राज्य, विभागीय , जिल्हा व तालुका पदाधिकारी कायकर्त सभासद उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस प्रदीप पेखळे यांनी सुत्रसंचलन तर निवृत्ती नाठे यांनी आभार मानले.