Home Blog माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे गोरख बोडके यांना महेश...

माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे गोरख बोडके यांना महेश गाढवे यांचे सडीतोड उत्तर 

0
2,991 Post Views

इगतपुरी तालुका : प्रतिनिधी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यावर खोटी टीका आम्ही सहन करणार नाही. ज्यांनी टीका केली ते गोरख बोडके आमदार सुहास कांदे यांच्या बरोबर काम करीत होते. त्यांच्यावर सुहास कांदे यांनी विश्वास टाकला, पण बोडके त्यांचे झाले नाही.स्वतः राष्ट्रवादी पक्षात असताना बोडके यांनी आपल्या पत्नीला जिल्हा परिषद निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चिन्हावर निवडणूकीत उतरवले. स्वतः पक्षासोबत एकनिष्ठ नाही वारंवार पक्षाच्या विरोधात काम करायचे आणि कोकाटे यांच्यावर टीका करायची अशी सोईस्कर भूमिका घेणाऱ्यांचे कोणीही मनावर घेणार नाही असे सडीतोड उत्तर महेश गाढवे यांनी प्रसिध्दी पत्रकारद्वारे दिले.

स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक मतदारसंघ किंव्हा विधानसभा निवडणूक असो बोडके यांनी कायम पक्ष विरोधात काम केले .आणि अशा लोकांनी पाच वेळेस आमदार झालेल्या माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. फक्त प्रसिध्दीसाठी बेताल वक्तव्य करायचे.पण त्यांना उत्तर देण्यासाठी आमच्या सारखे सक्षम कार्यकर्तेच आहे.

कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर बोलण्या इतकी पात्रता बोडके यांची नाही. ज्यांच्या सोबत राहायचं त्यांच्या सोबतच विश्वास घात करण्याची आपली परंपरा आहे .हे सर्व इगतपुरी तालुक्याला माहीत आहे.प्रत्येक समाजाच्या माणसाला कोकाटे यांनी न्याय दिला आहे. जिल्हा परिषद ,पंचायत समिती,मार्केट कमिटी ,जिल्हा नियोजन ,खरेदी विक्री संघ अशा महत्वाच्या संस्था यांच्यावर विविध समाजाच्या लोकांना प्रतिनिधी म्हणून न्याय दिला आहे . असे काम माणिकराव कोकाटे हेच करू शकता. अगोदर सिन्नरचा इतिहास तपासून बघा . कोणी कोणाला किती न्याय दिला. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन कोकाटे यांनी तीस वर्षे राजकरण केले. आणि त्याचेच फळ म्हणून कॅबिनेट मंत्री झाले.

कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय त्याचे फळ मिळत नाही.आणि ते फळ जनतेचे आशीर्वाद म्हणून मिळाले आहे. कोणाला आशीर्वाद रुपी फळ मिळते ते आशीर्वाद रुपी फळ कोकाटे यांना कृषिमंत्री म्हणुन मिळाले. यापुढे बोडके यांनी बोलताना विचार करून बोलवे, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.असा इशारा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे समर्थक महेश गाढवे यांनी गोरख बोडके यांना दिलेला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version