Home नाशिक आमदार रोहीत पवार यांचे बारामती नंतर आता नाशिक लोकसभा मतदार संघाकडे लक्ष

आमदार रोहीत पवार यांचे बारामती नंतर आता नाशिक लोकसभा मतदार संघाकडे लक्ष

0
221 Post Views

महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी रोहित पवार यांची सोमवारी जेलरोडला जाहीर सभा

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आता आमदार रोहित पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुकी नंतर त्यांनी आपला मोर्चा नाशिक लोकसभा मतदारसंघाकडे वळविला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातील जेलरोड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सोमवारी ( दि.१३ ) सायंकाळी सहा वाजता नारायण बापू नगर येथील चौकातील इंदिरा गांधी चौकात रोहित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची जय्यत तयारी महाविकास आघाडी तर्फे केली जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी सभेला हजेरी लावावी, यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याची माहिती रोशन आढाव, गोटू आढाव यांनी दिली आहे.

बानगुडे पाटील अन रोहित पवार यांची संयुक्त सभा
राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी जेलरोड येथे नितीन बानगुडे पाटील आणि आमदार रोहित पवार यांची संयुक्त सभा आयोजित केली आहे. संयुक्त सभेला गर्दी होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस पथक तैनात केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version