नाशिकरोड : उमेश देशमुख
प्रयागराज कुंभमेळ्यासाठी मुंबई-पुणे, मुंबई-महु आणि मुंबई-नागपूर-दानापूर दरम्यान ३४ विशेष गाड्या चालवणार आहे. मुंबई-मऊ कुंभमेळा 01033 गाडी ९, १७, २२, २५ जानेवारी, ५, २२ आणि २६ फेब्रुवारीला मुंबई सीएसटी येथून सकाळी साडे अकराला सुटेल. या गाडीच्या सात सेवा होतील. परतीला 01034 ही गाडी १०,१८, २३, २६ जानेवारी आणि ६, २३, २७ सप्टेंबरला मऊ येथून २३.५० वाजता सुटेल.
गाडीच्या सात सेवा होतील. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, प्रयागराज, वाराणसी, आझमगड आदी ठिकाणी थांबेल. दोन वातानुकूलित व्दितीय, चार वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य व्दितीय चेअर कार आणि २ सामान्य श्रेणीचे डबे गाडीला आहेत. पुणे-मऊ कुंभमेळा 01455 या विशेष गाडीच्या १२ सेवा होतील. पुणे येथून ८, १६, २४ जानेवारी, ६, ८, २१ फेब्रुवारीला सकाळी १०.१० वाजता सुटेल. गाडी क्र. 01456 कुंभमेळा विशेष ९, १७, २५ जानेवारी, ७, ९, २२ फेब्रुवारीला मऊ येथून २३.५० वाजता सुटेल. दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणी थांबेल. संरचना : दोन वातानुकूलित व्दितीय, दोन वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ६ सामान्य व्दितीय श्रेणी चेअर कार, १ सामान्य व्दितीय श्रेणी. नागपूर-दानापूर कुंभमेळा 01217 गाडीच्या ८ सेवा होतील. ही गाडी २६ जानेवारी, ५, ९, २३ फेब्रुवारीला नागपूर येथून सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुस-या दिवशी अकराला पोहोचेल. कुंभमेळा गाडी क्रं. 01218 ही गाडी २७ जानेवारी, ६, १०,२४ फेब्रुवारीला दानापूर येथून सकाळी १६.०० वाजता नागपूरकडे सुटेल. बुकिंग २० डिसेंबरला सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल.