Home Blog बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आडगाव आणि उपनगर परिसरात कडकडीत बंद

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आडगाव आणि उपनगर परिसरात कडकडीत बंद

0
472 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी ( दि. १७. )रोजी आडगाव व जत्रा हॉटेल आणि कोणार्क नगर तसेच विविध उपनगर परिसरात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. बंधला स्थानिक व्यापारी आणि व्यवसायिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने समाधान व्यक्त केले.

सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आडगाव येथील मारुती मंदिरात सकाळी साडेनऊ वाजता सभा घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान सकल मराठा समाज बांधवांच्या आवाहनानुसार आडगाव गाव, ट्रक टर्मिनल, जत्रा हॉटेल परिसर , कोणार्क नगर एक आणि दोन, तसेच विविध उपनगरे यामधील सर्व आस्थापना, विविध व्यवसायिकांचे दुकाने हे कडकडीत बंद होती. जत्रा हॉटेल चौकात आडगाव पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त होता. देशमुख हत्याकांडातील आरोपींची कसून चौकशी करून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे.

पहिल्यांदाच उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये प्रकरणी आडगाव आणि परिसरातील नागरिकांनी बंद पुकारला. त्याला परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे मंगळवारी पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला. असे चित्र दिसून आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version