देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज अहिरे यांनी विधिमंडळात सदस्य म्हणून आमदारकीची शपथ घेतली. यानंतर लगेचच त्यांनी मतदारसंघात आभार दौरा सुरू केला. राज्यात विकास कामाबाबत देवळाली मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करून देईल, असा संकल्प त्यांनी मतदारांसमोर मांडला. मतदारांनी देखील त्यांना प्रतिसाद दिला. त्यामुळे पहिल्याच दिवशी आमदार अहिरे यांच्यादौरा लक्षवेधक ठरला.
देवळाली विधानसभा मतदार संघात अधिक विकास कामे करुन महाराष्ट्रात मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण करुन देण्यासाठी मी प्रयत्नशील असून कोणतेही काम करत असताना आपले आशिर्वाद आणि सोबत महत्वाची आहे. तर मतदारसंघात शेतकरी केंद्रबिंदू मानुन काम करेन असे प्रतिपादन आमदार सरोज आहिरे यांनी केले. मंगळवारी ( दि. १० ) पळसे येथून त्यांनी आभार दौऱ्याला सुरुवात केली त्यावेळी त्या बोलत होत्या. पळसे गावच्या वतीने सरपंच कमलबाई गायधनी,उपसरपंच भाऊसाहेब गायधनी यांच्यासह ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांचा सत्कार झाला. आमदार सरोज आहिरे पुढे म्हणाल्या की, मायबाप जनतेने दुसऱ्यांदा संधी दिली.बहे ऋण कधीच फिटणार नाही. आज मी जर सत्तेत नसती तर ऐवढा मोठा निधी मतदार संघाला मिळणे अशक्य होते. म्हणून मी दादानं सोबत गेली. आणि मतदार संघाचा विकास साधला.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय
राजुर बहुला येथे एमआयडीसी
राजुरबहुला याठिकाणी एमआयडीसी आरक्षण असुन त्याठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या आणुन तरुणांना रोजगार मिळून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तर गिरणारे भागात टोमॅटो साठी नवीन बायो प्रोजेक्ट कसा निर्माण करता येईल हे माझे येणाऱ्या काळात प्रयत्न असणार आहे.शिवाय शेतशिवार रस्त्यासाठी आपण सरकार कडे आग्रह धरणार असुन खरा विकास या रस्त्यापासून सुरु होत असल्याचे सांगितले.