Home Blog धनशक्ती हरली अन जनशक्ती जिंकली!; आमदार अँड. राहुल ढिकले यांचा ८७ हजार...

धनशक्ती हरली अन जनशक्ती जिंकली!; आमदार अँड. राहुल ढिकले यांचा ८७ हजार ८१७ मतांनी दणदणीत विजय ; गणेश गीते यांचा दारुण पराभव

0
1,167 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अँड. राहुल ढिकले यांचा दणदणीत विजय झाला. त्यांना एक लाख ५६ हजार,२४६ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचा तब्बल ८७ हजार ८१७ मताधिक्याने दारुण पराभव झाला. गीते यांना ६८ हजार ४२९ मतांवर समाधान मानावे लागले. आमदार अँड. ढिकले यांच्या विजयाची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

महायुतीचे उमेदवार अँड.आमदार ढिकले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्यामध्ये काटे की टक्कर होईल, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता. संपूर्ण प्रचारादरम्यान अटीतटीची लढत होईल, अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात मतमोजणीनंतर भलतेच घडले. अतिशय एकतर्फी निवडणूक झाली. मागील निवडणुकीत आमदार ढिकले यांनी बाळासाहेब सानप यांच्या विरोधात सुमारे साडेबारा हजाराच्या आसपास मताधिक्य घेत विजय मिळविला होता. त्यामुळे या निवडणुकीत आमदार ढिकले यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होणार की घट होईल, असा प्रश्न निर्माण झाला होता. महाविकास आघाडीतर्फे गीते यांना उमेदवारी मिळाल्यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण होईल, असा अंदाज काहीजण व्यक्त करीत होते. आमदार अँड. ढिकले यांना निवडणूक जड जाईल, गणेश गीते सरस ठरतील, अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होत्या. परंतु मतदारांनी अश्या प्रतिक्रियांना छेद दिला. आमदार अँड ढिकले यांचा दणदणीत विजय झाला. नाशिक पूर्व मधील जनता जनार्दन आमदार ढिकले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे ढिकले यांचा तब्बल ८७ हजार ८१७ हजाराच्या मताधिक्क्याने विजय झाला. गणेश गीते यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चुरशीची होईल, असा दावा करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना मतदारांनी चांगले तोंडघशी पाडले, हेच या निवडणुकीच्या निकालाचे  वैशिष्ट्य ठरू शकते.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय

नाशिक पूर्व मधील उमेदवारांना मिळालेली मते

आमदार अँड राहुल ढिकले १ लाख ५६ हजार २४६, महाविकास आघाडीचे गणेश गीते ६८ हजार ४२९, मनसे प्रसाद सानप ४ हजार ९८७, प्रसाद जामखिंडीकर ११४३ , अपक्ष गणेश गीते ८३५ आणि नोटा एक हजार, ९८९ मते मिळाली आहे. उर्वरित उमेदवारांना अतिशय कमी मते मिळाली आहे.

धनशक्ती पेक्षा जनशक्ती सरस

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये या वेळेला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारचा आरोप प्रत्यारोप निवडणूक प्रचारादरम्यान केला गेला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेका विरोधात आरोप प्रत्यारोप केले. सुरुवातीला आमदार ढिकले यांना निवडणूक एकतर्फी वाटत होती. परंतु गणेश गीते यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. प्रचारादरम्यान देखील निवडणुकीत चुरस दिसली. तसेच पैशाचा वारेमाप वापर झाल्याचा आरोप आमदार ढिकले यांच्यासह समर्थकांनी केला. गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांना पैसे वाटप करीत असल्या प्रकरणात ढिकले समर्थकांनी अडविले होते. पंचवटीत देखील पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप झाला. दोनवेळा गीते यांच्या समर्थकांच्या चारचाकी वाहनांचे नुकसान केल्याचा आरोप झाला. एकूणच आमदार ढिकले आणि गीते समर्थकांमध्ये वादविवाद, शाब्दिक बाचाबाची आणि काही प्रमाणात तणाव असल्याची परिस्थिती होती. प्रचारादरम्यान आमदार ढिकले यांच्या समर्थकांनी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात ते यशस्वी झाले. सरतेशेवटी आमदार ढिकले यांनी गणेश गीते यांचा पराभव करून दुसऱ्यांदा विजय संपादित केला.

सुप्रिया सुळे यांची मध्यस्ती

नाशिक पूर्व मतदार संघात आमदार ॲड. राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्या समर्थकांमध्ये वादविवाद झाला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट शहर पोलीस आयुक्त यांचे कार्यालय गाठले.गणेश गीते आणि त्यांच्या समर्थकांवर अन्याय झाला. अशी तक्रार केली होती. २०२४ पंचवार्षिक निवडणुकीतील ही एक महत्वाची घडामोड ठरू शकते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version