Home Blog अखेर आमदार अँड. राहुल ढिकले यांचा शब्द खरा ठरला !; काय होता...

अखेर आमदार अँड. राहुल ढिकले यांचा शब्द खरा ठरला !; काय होता शब्द, बघा व्हायरल व्हिडिओ

0
1,082 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड. राहुल ढिकले यांनी मतमोजणीपूर्वी कार्यकर्त्यांना एक शब्द दिला होता. तो म्हणजे मी २५ हजारापेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आलो, तरच पुढील पंचवार्षिक निवडणूक लढवेन. अन्यथा निवडणूक लढविणार नाही, असा शब्द दिला होता. मतमोजणीच्या सोळाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या पेक्षा आमदार अँड. ढिकले यांनी ६८ हजार १७७ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आमदार अँड ढिकले यांचा शब्द तंतोतंत खरा ठरला आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत सोळाव्या फेरी अखेर आमदार अँड. राहुल ढिकले यांना एक लाख १२ हजार ६०९ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांना ४४ हजार ४३२ मते मिळाली. त्यामुळे सोळाव्या फेरीअखेर ॲड. ढिकले यांना ६८ हजार १७७ मतांची आघाडी मिळाली. प्रचारादरम्यान धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे निवडणुकीचे समीकरण होते. आमदार अँड. ढिकले यांचे वडील स्व. उत्तमराव ढिकले यांचा अर्वाच्य भाषेत विरोधकांनी उल्लेख केला होता. त्यामुळे आमदार अँड. ढिकले संतप्त झाले होते. आमदार ढिकले यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांना २५ हजरांपेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आलो तरच पुढील पंचवार्षिक निवडणूक लढवेन,शब्द दिला होता.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

… तर दाखवतो,आमदार काय करू शकतो

मतदार संघात काम केले, घाम गाळला आहे. जनतेवर विश्वास आहे. पण विरोधकांच्या भाषणाची एक क्लिप बघितली, त्यामध्ये माझ्या वडिलांविषयी अर्वाच्य भाषा वापरली गेली. तेव्हा विचार केला की, २५ हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय झाला तरच पुन्हा निवडणूक लढवेन, अन्यथा लढणार नाही. गरिबी, श्रीमंती बघितली आहे. ऊन, वारा पाऊस आणि चांगले, वाईट दिवस आम्ही अनुभवलेले आहेत. २५ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आलो की मग दाखवतो, आमदार काय करू शकतो. अशा स्वरूपाचा उल्लेख ढिकले यांच्या व्हायरल क्लिप मध्ये आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version