Home Blog छगन भुजबळांना खरवंडी गावातील मतदान केंद्रात जाण्यापासून रोखल्याचे कारण काय ?, व्हिडिओ...

छगन भुजबळांना खरवंडी गावातील मतदान केंद्रात जाण्यापासून रोखल्याचे कारण काय ?, व्हिडिओ बघा

0
791 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

येवला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार छगन भुजबळ यांना खरवंडी गावातील मतदान केंद्रात जाण्यापासून रोखल्याचा व्हिडिओ राज्यात व्हायरल झाला. पण भुजबळांना मतदान केंद्रात जाण्यापासून विरोध का करण्यात आला. याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे. वास्तविक भुजबळ उमेदवार असल्याने त्यांना मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार आहे. असे असताना भुजबळांना विरोध झाल्याच्या कारणाची वेगवेगळी चर्चा होताना दिसून येते आहे.

महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ नेते आहे. त्याचप्रमाणे राज्यातील ओबीसी समाजाच्या न्याय, हक्कासाठी त्यांचा कायम संघर्ष सुरू असतो. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे समीकरण गेल्या काही दिवसापासून निर्माण केल्याचा प्रयत्न होताना दिसतो. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध दर्शविणारे नेते अशी राज्यभरात छगन भुजबळ यांची प्रतिमा झालेली दिसते. त्याचा परिणाम म्हणून प्रचारादरम्यान येवला विधानसभा मतदारसंघात भुजबळांना ठीक ठिकाणी विरोध झाल्याचे दिसून येत होते. भुजबळ यांच्या निवडणुकीकडे राज्यातील सर्वच नेतेमंडळींचे लक्ष लागून आहे. येवला विधानसभा मतदारसंघात यावेळेला प्रथमच भुजबळ यांना निवडणूक प्रचारादरम्यान दररोज विविध अडचणीचा सामना पाहायला मिळाला. असे बोलले जात आहे. मतदानाच्या दिवशी येवला विधानसभा मतदारसंघातील खरवंडी गावातील मतदार केंद्रावर छगन भुजबळ पाहणी साठी आले होते. मतदान केंद्रात जात असताना भुजबळ यांना विरोध करण्यात आला. त्याचे कारण म्हणजे भुजबळ यांच्यासोबत असणारी नेतेमंडळी असल्याची चर्चा केली जात आहे. भुजबळ यांना एकट्याला मतदान केंद्रात जाण्यास विरोध नव्हता. परंतु त्यांच्यासोबत असलेल्या नेतेमंडळीना भुजबळ यांच्या सोबत मतदान केंद्रात जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका सुरुवातीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची होती. परंतु शाब्दिक बाचाबाची,आरडाओरडा आणि गोंधळामुळे भुजबळांना अधिक विरोध वाढला. भुजबळ आपली भूमिका मांडत होते, परंतु कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर भुजबळ यांनी समजदारपणा दाखवत काढता पाय घेतला. त्यामुळे भुजबळ यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे बोलले जात आहे.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

येवल्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

येवला विधानसभा मतदारसंघात या वेळेला प्रथमच महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे यांच्यात काटे की टक्कर होईल, असे वातावरण दिसून येत आहे. यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार शिंदे की भुजबळ ?, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. भुजबळ यांच्या दृष्टीने यावेळेसची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची असणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version