487 Post Views
नाशिक : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांची प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी ( दि. १८ ) नाशिक रोड परिसरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. आमदार ढिकले यांना मतदार पुन्हा एकदा नाशिक पूर्व मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवतील, असा विश्वास या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
आमदार ढिकले यांच्या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. ठिकठिकाणी फटाकड्यांचे आतिषबाजी करण्यात आली. तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जेसीबीच्या सहाय्याने भव्य पुष्पहार आमदार ढिकले यांना अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात जयघोष करण्यात आला. तसेच रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्याचप्रमाणे रॅलीमध्ये प्रचारासाठी आलेल्या वाहनांची संख्या देखील उल्लेखनीय होते. सकाळी जेलरोड येथील दसक चौकातून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यानंतर नाशिक रोड येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्यामुळे आमदार ढिकले पुन्हा एकदा निवडून येतील ल,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, महापालिकेचे माजी सभागृह नेते संभाजी मोरुस्कर, नाशिक रोड मंडळाचे अध्यक्ष शांताराम घंटे,माजी नगरसेवक विशाल संगमनेरे, सचिन हांडगे,राजेश आढाव आदींची उपस्थिती होती.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय