Home Blog विधिमंडळात देवळालीचे प्रतिनिधित्व योगेश घोलप करणार !; गणेश गायधनी

विधिमंडळात देवळालीचे प्रतिनिधित्व योगेश घोलप करणार !; गणेश गायधनी

0
493 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

देवळाली विधानसभा मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. देवळाली मतदार संघात परिवर्तन निश्चितपणे होईल, असे मतदारांच्या प्रतिसादावरून निदर्शनास येत आहे. त्यामुळे २०२४ पासून राज्यातील विधिमंडळात देवळालीचे नेतृत्व माजी आमदार योगेश घोलप करणार, असा दावा शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांनी केला आहे.

गणेश गायधनी यांनी सांगितले की, देवळाली विधानसभा मतदारसंघात योगेश घोलप ठिकठिकाणी प्रचार दौरा करीत आहे. दौऱ्याप्रसंगी नागरिकांचा घोलप यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून या वेळेला नागरिकांनी देवळाली विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करणे जवळपास निश्चित केले आहे देवळाली मतदारसंघात विकास कामांचा बागुलबुवा केला जातो आहे. विकास कामे झाली पण ती निकृष्ट दर्जाची झाली. अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाकडे सुज्ञ मतदारांचे लक्ष आहे. त्यामुळे विकास कामांचा कितीही गाजावाजा केला, तरी ती निकृष्ट दर्जाचे कामे असल्यामुळे त्याच्यावर पाणी फिरले गेले. असे गणेश गायधनी यांनी म्हटले.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय

मनमानी कारभाराने जनता त्रस्त !

गणेश गायधनी म्हणाले की, देवळाली विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व मनमानी कारभार करतात. सामान्य कार्यकर्त्याला जुमानत नाही, पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही, स्वतःच्या मनाला वाटेल तसा कारभार करीत असतात. त्यामुळे पाच वर्षात त्यांच्याविषयी मतदार संघात नाराजीचा सूर आहे. गल्लीपासून ते मुंबई पर्यंत त्यांच्याविषयी नाराजी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले. मतदारसंघातील जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असेल तर त्यांना विजय कसा मिळू शकतो, असा प्रश्न गणेश गायधनी यांनी उपस्थित केला आहे. २९२४ पासून राज्याच्या विधिमंडळात माजी आमदार योगेश घोलप असणार आहे. मतदारांनी त्यावर शिक्कामोर्तब केला आहे असा पुनरुच्चार गणेश गायधनी यांनी केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version