Home Blog आमदार ढिकले यांचा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासावर भर !; जेष्ठ नगरसेवक दिनकर...

आमदार ढिकले यांचा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासावर भर !; जेष्ठ नगरसेवक दिनकर आढाव

0
402 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार राहुल ढिकले यांनी खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास केला असे म्हणावे लागेल. त्याचे कारण म्हणजे सर्व समाजातील घटकांसाठी त्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता काम केले आहे. मुस्लिम समाज असो किंवा गोसावी समाज यांच्या दफनभूमीसाठी आमदार ढिकले यांनी प्रचंड परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे मतदार संघातील ठीक ठिकाणी विकास कामे उभी केली. त्यामुळेच आमदार ढिकले यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनी दिली.

ज्येष्ठ नेते दिनकर आढाव यांनी पुढे सांगितले की, मागील पाच वर्षात नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. विकास कामे करताना आवश्यक त्या ठिकाणी गरजेनुसार त्यांनी निधी मंजूर केला. मतदारांची विविध मागण्यांची पूर्तता केली. सभामंडप, मंदिरे रस्ते असोत अथवा क्रीडा संकुल असो आदी अनेक कामे उभी केली. मतदारांच्या डोळ्यात भरेल असा आमदार ढिकले यांच्या कार्याचा आढावा घेता येईल. मतदार संघाचा सार्वजनिक सर्वांगीण विकास करताना आमदार ढिकले यांनी ज्येष्ठ नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे नागरिकांचे मार्गदर्शन घेतले. कुणालाही लहान मोठा समजले नाही, सर्वांना एक समान वागणूक दिली, कोणी लहान आणि कोणी मोठा अशी तुलना केली नाही. परिणामी सर्वच नेते, कार्यकर्ते आमदार ढिकले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून आमदार ढिकले यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतील, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर आढाव यांनी पुन्हा व्यक्त केला.

नांदूर नाका परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

दोन उड्डाणपूल मंजूर!; दिनकर आढाव

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात नाशिक ते संभाजीनगर महामार्ग येतो. काही दिवसांपूर्वी मिरची हॉटेल येथे बस अपघात होऊन बसला आग लागली होती. यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. वाहतूक कोंडी अन् रहदारीने युक्त असलेल्या मिरची हॉटेल आणि नांदूर नाका येथे आमदार राहुल ढिकले यांनी उड्डाणपुल मंजूर केले आहेत.थोड्याच दिवसात उड्डाणपुलाचे काम देखील सुरू होईल. वाहतूक कोंडी, रहदारीने आणि अपघाताने त्रस्त नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच अपघातग्रस्त रस्ता अशी निर्माण झालेली ओळख पुसण्यास यामुळे मदत होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version