Home Blog सिन्नरच्या विकासासाठी उदय सांगळे यांना विधानसभेत पाठवा!; आमदार रोहित पवार यांचे आवाहन

सिन्नरच्या विकासासाठी उदय सांगळे यांना विधानसभेत पाठवा!; आमदार रोहित पवार यांचे आवाहन

0
407 Post Views

सिन्नर : प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे तरुण आणि उदयन्मुख नेतृत्व आहे. त्यांना सिन्नर मतदार संघातील समस्यांची उत्तम जाणीव आहे. सिन्नरच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, यासाठी उदय सांगळे यांना राज्याच्या विधानसभेत सिन्नरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

शनिवारी ( दि.१७ ) सिन्नर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. आमदार पवार पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यमान महायुती सरकारने राज्यातील उद्योगधंदे, व्यवसाय गुजरातला दान केले आहे.त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. जवळपास आठ ते नऊ लाख कोटीचे प्रकल्प गुजरात मध्ये गेले. त्याविषयी महायुतीचा एक नेताही बोलत नाही. यासाठी आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन सिन्नरचे नेतृत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवावे. उदय सांगळे यांचे सामाजिक,राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांचा जनसंपर्क उत्तम आहे.काम करण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. सिन्नर साठी आपण काहीतरी वेगळे करून दाखवू,अशी त्यांच्यात उर्मी आहे. सिन्नरच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी तसेच विकासासाठी उदय सांगळे यांनाच आपण विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले. याप्रसंगी कोंडाजी मामा आव्हाड,गोकुळ पिंगळे,बाळासाहेब वाघ,संजय इंदुलकर,नईम खान,काशिनाथ कोरडे,दिनेश धात्रक,संजय सोनावणे,राजाराम मुरकुटे,संजय सानप,संगीता गायकवाड,समाधान वारुंगसे,दीनानाथ उगाडे आदी उपस्थित होते.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले

महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा,नाहीतर मला खासदार करून काहीच उपयोग होणार नाही, राज्यात सरकार आलं तरच आम्ही दोघे विकास करू शकतो.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले

उदय भाऊ आमच्या नगरचे जावई आहेत, तेरा वर्षाच्या संसारात आम्हाला जावई म्हणून कधीही पश्चाताप झाला नाही. तुम्हाला ही होणार नाही.यासाठी आपण उदय सांगळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

भारत कोकाटे म्हणाले

जाती पतीच्या च्या राजकारणात न पडता उदय सांगळे यांना निवडून द्यावे,खडार राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे मिळून टाकेद गट आणि सिन्नरचा विकास करतील, असा विश्वास मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे यांनी व्यक्त केला.

उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव म्हणाले

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी उदय सांगळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version