Home Blog शिवसेना शिंदे गटाचा आमदार सरोज अहिरे यांनाच पाठिंबा!; सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे...

शिवसेना शिंदे गटाचा आमदार सरोज अहिरे यांनाच पाठिंबा!; सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे प्रसिद्धी पत्र

0
902 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

देवळाली विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज अहिरे यांना शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धी पत्र काढले आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमदार सरोज यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे. शिंदे गटाने पाठिंबा दिल्यामुळे आमदार सरोज अहिरे यांच्या ताकतीत निश्चितपणे भर पडणार आहे. अशी चर्चा केली जात आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदार सरोज अहिरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.आमदार अहिरे या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट तसेच रिपाई आठवले गटासह आदी विविध पक्षांचा समावेश आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाने अपक्ष उमेदवार राजश्री अहिराव यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला होता.त्यामुळे महायुतीत बंडाळी असे चित्र दिसून आले.परंतु वरिष्ठ स्तरावर झालेल्या राजकीय चर्चेनंतर शिवसेना शिंदे गटाने राजश्री अहिराव यांच्या ऐवजी विद्यमान आमदार तसेच महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धी माध्यमांसाठी पत्रक काढून पाठिंबा जाहीर केला आहे.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

शिंदे गटात दोन गट !

आमदार सरोज अहिरे यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना शिंदे गटातच दोन गट पडलेले दिसतात. अशी चर्चा दिसून येत आहे. एका गटाने राजश्री अहिरराव यांना पाठिंबा द्यावा, अशी भुमिका घेतलेली दिसते.तर दुसरा गट महायुतीचा धर्म पाळत आमदार सरोज अहिरे यांना पाठिंबा द्यावा,अश्या विचारधारेचा असल्याचे बोलले जाते आहे.

पत्र आठ नोव्हेंबर चे अन् प्रसिद्ध सोळा नोव्हेंबरला

शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचे पत्र आहे. त्यात आमदार सरोज अहिरे यांना पाठिंबा दिल्याचा उल्लेख आहे. पत्रावर आठ नोव्हेंबर तारीख आहे. परंतु माध्यमांच्या हातात सोळा नोव्हेंबरला मिळाले. नऊ दिवसानी उशिरा पत्र मिळाल्याचे कारण काय असावे,अशी चर्चा मतदार संघात होऊ लागली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version