Home Blog देवळालीतील विकास कामे निकृष्ट दर्जाची!; घोलप यांची कामे आजही शाबूत!; संतोष ...

देवळालीतील विकास कामे निकृष्ट दर्जाची!; घोलप यांची कामे आजही शाबूत!; संतोष गायधनी

0
527 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी यापूर्वी देवळाली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात मतदार संघाला अगदी कमी निधी मिळत होता. त्यामुळे विकास कामे करताना मर्यादा पडत होत्या. आजच्या घडीला तसे नाही विद्यमान आमदारांना अधिक निधी मिळाला. त्यामुळे विकास कामे त्यांनी केली. परंतु त्यांनी केलेली विकास कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. तर घोलप कुटुंबीयांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे आजही शाबूत आहे. असा दावा पळसे येथील संतोष गायधनी यांनी केला.

गायधनी म्हणाले की,पूर्वी वार्षिक ५० लाख रुपये निधीत ८६ गावांची कामे मार्गी लावणे अत्यंत अवघड होते. १ जुलै २०१७ रोजी GST लागू झाला. त्यानंतर सरकारी तिजोरी मुबलक प्रमाणात पैसा उपलब्ध होऊ लागला. दरम्यान सरकारी कामांचे निधीत वाढ झाली. रस्ते,पाणी आदी विकास कामांना मंजुरी मिळाली. शासनाकडून भरघोस प्रमाणात निधी मिळत गेला त्यामुळे देवळाली नव्हे महाराष्ट्रातील सर्वच आमदारांना विकास मतदारसंघात विकास कामे करण्याची संधी मिळाली परंतु देवळालीतील विकास काम यांची अवस्था बघितली तर अतिशय निकृष्ट दर्जाचे विकास कामे केली आहे. १३०० कोटी रुपये निधी विद्यमान आमदारांना दिला. त्यांनी केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. प्रत्येक काँक्रीट रस्ता १५ वर्षे टिकायला हवा.तो वर्षभरात फुटू लागला,कमी ग्रेडचे सिमेंट प्रत्येक सिमेंट रस्त्याला वापरण्यात आले आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी हे तपासून बघितल्यास सत्य नक्की समोर येईल,असे संतोष गायधनी यांनी सांगितले.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय

घोलप कुटुंबीयांचे भरीव कामे

मतदारसंघातील पूर्ण शेती क्षेत्र घोलप कुटुंबीयांनी पाण्याखालीआणली, कश्यपी,वालदेवी,अंजनेरी,महिरवणी गौतमी गोदावरी,दुडगाव यांसह आळंदी धरण जे पूर्वीपासूनच अस्तित्वात होते ,मात्र त्याचे बारमाही पाणी कॅनाल द्वारे पूर्ण मतदार संघात बारमाही वितरित करण्याचे नियोजन केले. धरणांमुळे देवळाली मतदार संघात पाण्याचे दुर्भिक्ष्य कधीच निर्माण झाले नाही. शेती सुजलाम व सुफलाम झाली.शेतीला मुबलक पाणी मिळाले. शेतकरी आर्थिक संपन्न होण्यास मदत मिळाली. यादरम्यान नद्यांचे पूल व त्याद्वारे गावे जोडली गेली. दळणवळण वाढले,गावखेड्यांचा शहरांशी संपर्क होण्यास मदत मिळाली. गावांतर्गत काँक्रीट रस्ते,ग्रामपंचायतबल कार्यालये,सभा मंडप,अनेक मंदिरे,स्मशानभूमी,शेकडो किलोमीटरचे डांबरी रस्ते आदी अनेक छोटी मोठी कामे केवळ २५ ते ३० कोटी रुपयात झाली. शिवाय उच्च प्रतीची कामे झाली. ती आजही उत्तम स्थितीत उभी आहेत.

योगेश घोलप यांची कामे

२०१४ ते २०१९ दरम्यान आमदार योगेश घोलप यांनी ५५० कोटींची कामे मतदार संघात केली. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाका. त्यांनतर ५०० कोटींचा निधी खर्च केला. १४ कोटीचा निधी पळसे गावात खर्च केला. त्यात ४ कोटींच्या पाणी योजनेचा सामावेश आहे. आज पळसे गावाला पाणी दिले जाते. ४ कोटींचा बंगाली बाबा सहकारी साखर कारखाना रस्ता,गाव व कॉलनी मधील सर्व काँक्रीट रस्ते,मंदिर व बचतगटाची सुसज्ज इमारत यासारखे अनेक कामांचा समावेश आहे. असे गायधनी यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version