Home Blog विजयरथाची सुरुवात आडगाव मधूनच!; आमदार अँड राहुल ढिकले

विजयरथाची सुरुवात आडगाव मधूनच!; आमदार अँड राहुल ढिकले

0
946 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात आडगाव शुभसंकेत ठरले. प्रथम या गावाने मला प्रचंड मताधिक्य देऊन विधानसभेत पाठविण्याचा एकमुखी ठराव मंजूर केला. यानंतर सर्वच ठिकाणी एकमुखी पाठिंबा मिळत गेला. त्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्या विजयरथाची सुरुवात आडगाव मधूनच होईल,असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी ( दि.१६ ) सकाळी आडगाव येथे चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार अँड राहुल ढिकले बोलत होते. आमदार राहुल ढिकले पुढे म्हणाले की आडगाव हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. बदलत्या काळानुसार आडगावने आपली विचारसरणी बदलली. गावाचे अजून एक वैशिष्ट्य आहे.त्यांनी एकदा एखादा निर्णय घेतला की, तो ठामपणे अमलात आणतात. त्यासाठी कुणाचाही दबाव वगैरे ते पाळत नाही. एकदा शब्द दिला की तो मागे फिरवत नाही, त्यामुळे मला प्रचंड आत्मविश्वास निवडणुकीमध्ये निर्माण झाला आहे. आडगाव माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, त्याचा सार्थ अभिमान महायुतीला आणि मला आहे. आडगावकरांनी दाखवलेल्या एकमुखी पाठिंब्यामुळे मला निवडणूक प्रचारात प्रचंड दिलासा मिळाला. आणि नवीन चेतना मिळाली. आडगाव बद्दल असलेल्या अभिमानाला कधीही तडा जाऊ देणार नाही. असा मी आज तुम्हाला शब्द देतो. आज चौक सभा होती. पण चौक सभेचे रूपांतर या प्रचंड जनसमुदायात झाले. त्यामुळे माझ्या विजयाचा रथ हा आडगाव मधूनच निघेल, असा ठाम आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला आहे.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय

वीस वर्ष मला जवळ केले नाही : उद्धव निमसे

यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी स्थायी समिती सभापती उद्धव बाबा निमसे म्हणाले की, मी गेल्या वीस वर्षापासून नगरसेवक आहे. आडगावकरांना जवळ करण्याचा प्रचंड प्रयत्न केला, त्यासाठी मोठा आटापिटा केला, परंतु आडगावकरांनी मला जवळ केले नाही.आणि आडगावकरांचा एक खास वैशिष्ट्य आहे की, ते ज्याला जवळ करतात, ज्याला पाठिंबा देतात,त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. आज आमदार अँड राहुल ढिकले यांना पाठिंबा देऊन ते ढिकले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. याविषयी समाधानी वाटते.

यांची होती उपस्थिती

भाई पुंजा माळोदे,दामू अण्णा शिंदे,रामदास नवले,दौलत शिंदे,टी. वाय. लभडे,प्रभाकर माळोदे, भिकाजी शिंदे, उत्तमराव कडलक, सुरेश लभडे,बाजीराव लभडे,मनोहर शिंदे,ॲड प्रकाश शिंदे,संदीप लबडे,सुरेश मते , शांताराम माळोदे,अरुण मते,एकनाथ तपकिरे,दत्तू शिंदे , विठ्ठल राजे माळोदे,भाऊसाहेब शिंदे,अँड मनोज बोढाई,बाळकृष्ण राऊत,शिवाजी साठे,विलास हरिभाऊ जाधव,शंकर जाधव,प्रकाश पेंढारकर,शांताराम गायकवाड , रामभाऊ संधान,शेखर लभडे तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी संतोष भोर,युवराज झोमान,गणेश माळोदे,अँड नामदेव शिंदे,अँड कैलास शिंदे ,अभय माळोदे ,जालिंदर शिंदे,नितीन माळोदे,सागर माळोदे,सागर खांदवे,जाफर सय्यद,सुभाष शिंदे,निलेश मस्के,मदन लभडे ,सुरेश देशमुख, राजेंद्र देशमुख,सतीश माळोदे, कृष्णा राऊत,विशाल जाधव,सनी धारबळे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version