411 Post Views
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर विधानसभा मतदार संघाची सत्ता मागील वीस वर्षापासून केवळ एका व्यक्तीच्या हातात आहे.त्यामुळे संबंधित व्यक्तीची मनमानी मतदारसंघात सुरू आहे. मी केवळ मोठे कामे करतो,छोट्या कामांसाठी माझ्याकडे वेळ नाही, अशी त्यांची भूमिका आहे.त्यामुळे छोट्या छोट्या कामांपासून मतदार वंचित राहतो आहे. मतदारसंघाचे भवितव्य घडवायचे असेल तर त्यासाठी या वेळेला बदल करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन सिन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांनी केले.
सिन्नर विधानसभा मतदारसंघातील टाकेद गटातील सोळा गावांमध्ये उदय सांगळे यांनी शुक्रवारी बिरसा मुंडा जयंती निमित्ताने प्रचार केला. त्यावेळी मतदारांशी संवाद साधताना उदय सांगळे बोलत होते. बिरसा मुंडा जयंती निमित्ताने उदय सांगळे यांनी ठिकठिकाणी अभिवादन केले. यादरम्यान सांगळे यांची बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली. उदय सांगळे पुढे म्हणाले की, क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारणार, असे आश्वासन विद्यमान आमदारांनी दिले होते. परंतु पाच वर्षे झाली,त्याची पूर्तता झाली नाही. केवळ आश्वासन द्यायचे, आणि काम करायचे नाही,अशी त्यांची नीती त्यांची आहे. आदिवासी समाजाची मते घ्यायची, मात्र आदिवासी समाजाची कामे करायची नाही,आदिवासी आमदारांना मंत्रालयात उड्या माराव्या लागतात. तरी त्यांच्या समस्या मार्गी लागत नाही, घड्याळाला मतदान म्हणजे भारतीय जनता पार्टीला मतदान आहे. भारतीय जनता पार्टीचे धोरण आदिवासी समाजाच्या विरोधात असल्याचे मणिपूर येथील घटनेवरून स्पष्ट दिसून येते. असे उदय सांगळे यांनी सांगितले. याप्रसंगी भारत कोकाटे, निवृत्ती जाधव (उपजिल्हा प्रमुख उबाठा), काशिनाथ कोरडे, किरण डगले, हरिदास लोहकरे, साहेबराव झंकार, खंडेराव ओझंकार, समाधान वारंघुसे, भाऊसाहेब वाजे, सह आदिवासी बांधव, कार्यकर्ते पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय