939 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिकरोडचे भूषण म्हणून येथील आय.एस.पी.आणि सी एन.पी. प्रेसची ओळख आहे. प्रेस च्या माध्यमातून हजारो कुटुंबाला रोजगार मिळाला आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रेस कामगारांच्या अडचणी,समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आमदार अँड राहुल ढिकले यांनी सांगितले. यावेळी प्रेस कामगार नेते तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी ( दि. १५ ) सकाळी आमदार अँड राहुल ढिकले यांनी सी.एन.पी. प्रेस गेट समोर कामगारांसोबत संवाद साधला. गुरुवारी आय. एस. पी. प्रेस गेट येथे ढिकले यांनी प्रचार केला होता. प्रेस कामगार संघटनेच्या नेत्यांनी आमदार ढिकले यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला.
आमदार ढिकले यावेळी म्हणाले की एक वेळ अशी होती की,नाशिक रोडची संपूर्ण अर्थव्यवस्था प्रेस कामगारांवर अवलंबून होती. प्रेस कामगारांचा सहा तारखेला पगार झाल्यानंतर नाशिक रोड बाजारपेठेत रेलचेल दिसून येत होती. दहा हजाराच्या आसपास प्रेस कामगार संख्या होती. आज तीन हजारावर आहे. अत्याधुनिक मशनरी,बदलते कामगार धोरण यासाठी कारणीभूत असून सर्व प्रेस कामगार संघटितया धोरणाचे विरोधात लढा देत आहे. त्याचे कौतुक करीत आमदार ढिकले यांनी आपण प्रेस कामगारांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रेस कामगार नेते हरिभाऊ ढिकले, भगवान लोळगे,माजी माजी नगरसेवक दिनकर आढाव, महापालिकेचे सभागृह नेते तथा माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, भाजपचे जेष्ठ नेते सुनील आडके, नाशिक रोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, नितीन चिडे, राम डोबे, राहुल कोथमीरे, शाम खोले, संतोष क्षिरसागर, दीपक जाधव,विक्रम कदम, नितीन चव्हाणके, बंटी काजळे, बबलु चंदनानी आदी उपस्थित होते.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय