Home Blog सिन्नर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिन्नर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
458 Post Views

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय पुंजाजी सांगळे यांना मतदार संघामधून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सांगळे यांना यावेळेस मतदार सिन्नर तालुक्याचे प्रतिनिधी करण्यासाठी विधानसभेत निश्चितपणे पाठवतील, असा ठाम विश्वास उदय सांगळे यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी ( दि.१४ ) सांगळे यांनी मतदारसंघात प्रचार दौरा केला होता.मतदार संघातील देवपूर, निमगाव देवपूर, खडांगळी, मेंढी, चोंढी, सोमठाणे,सांगवी, महाजपुर, दहिवडी, उज्जनी शिंदेवाडी,धनगरवाडी, पंचाळे ,मीठ सागरे,पुतळेवाडी, कारवाडी, विधनवाडी, झापेवाडी, मिरगाव,कोळगाव माळ आदि गावात उदय सांगळे यांचा प्रचार दौरा पार पडला. पाथरे बुद्रुक, वारेगाव येथे सायंकाळी चौक सभा झाली.यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

यावेळी मनोगत व्यक्त करताना उदय सांगळे म्हणाले की, सिन्नर मतदार संघात मी प्रचार दौरा सुरू केला आहे. यादरम्यान माझ्याकडे अनेक नागरिकांनी आपली व्यथा मांडली. गावातील समस्या आणि अडचणी माझ्यासमोर मांडल्या. त्यावर आपण निश्चितपणे उपाययोजना करू, असे आश्वासन मी गावातील त्रस्त नागरिकांना दिले. प्रचारादरम्यान मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी ठरणार आहे. सिन्नर मतदार संघात महाविकास आघाडीला येथील जनता जनार्दन सढळ हाताने मतदान करतील, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या वेळेला सिन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे उदय सांगळे यांनी सांगितले.

मतदार परिवर्तन करणार : सांगळे

२०२४ मधील विधानसभा निवडणुकीत सिन्नर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. येथील मतदार परिवर्तन घडवून आणणार आहे. यात मला कोणतीही शंका वाटत नाही. सिन्नर मध्ये बदल होणारच, अशी भूमिका महाविकास आघाडीची उमेदवार उदय सांगळे यांनी मांडली

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version